Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Viral
अहमदाबादच्या हाॅस्पिटलमध्ये पेशंटला भेटायला येणा-यांकडून 500 रुपये चार्ज आकारला जात असल्याचा दावा सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. ह्याचा दाव्याची पोस्ट आम्हाला शेअरचॅट या सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर आढळून आली. यात अहमदाबादच्या फिनिक्स हाॅस्पिटलचा फोटो शेअर करण्यात आला आहे व पोस्टमध्ये लिहिले आहे की, अहमदाबादच्या एका हाॅस्पिटलने आगळीवेगळी शक्कल लढविली आहे. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णास भेटायचे असेल तर प्रति व्यक्ती 500 रुपये फी ( Entry Fee) घेतली जाते. जमा होणारी फी ची रक्कम रुग्णाच्या बिलातून वजा केली जाते. यामुळे दिखाव्यासाठी किंवा औपचारिकता म्हणून येणाारे लोक कमी झाले आणि रुग्णालाही आर्थिक मदत मिळायला लागली.

व्हायरल होत असलेल्या दाव्याची पडताळणी सुुरु केली असता आम्हाला हा दावा मागील वर्षांपासून सोशल मीडियात व्हायरल होत असल्याचे आढळून आले.
आम्ही अहमदाबाद येथील ज्या हाॅस्पिटलच्या फोटोसह ही माहिती समाजमाध्यमात पसरत आहे, त्या फिनिक्स हाॅस्पिटलशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी असे कोणतेही शुल्क पेशंटला भेटण्यासाठी येणाऱ्या व्यक्तींकडून आकारण्यात येत नसल्याची माहिती दिली. अहमदाबादमधील गुजरात कॅन्सर हाॅस्पिटल आणि रिसर्च सेंटर या हाॅस्पिटलकडून ठरविलेल्या वेळे व्यतिरिक्त पेशंटला भेटण्यास येणाऱ्या अतिरिक्त व्यक्तीकडून दहा रूपये इतके शुल्क आकारण्यात येत असल्याचे आढळून आले.. इंडियन मेडिकल असोसिएशननेही (IMA) देखील स्पष्टिकरण दिले आहे की, अहमदाबादमधील कोणत्याही हाॅस्पिटलमध्ये अशा प्रकारचे शुल्क आकारण्यात आल्याचे आढळलेले नाही.

यावरुन हेच सिद्ध होते की अहमदाबादमधील कोणत्याही हाॅस्पिटलमध्ये पेशंटला भेटण्यास येणा-यात अतिरिक्त व्यक्तीकडून 500 रुपये प्रवेश फी आकारला जात नाही. सोशल मीडियात खोटा दावा व्हायरल झाला आहे.