Tuesday, March 19, 2024
Tuesday, March 19, 2024

HomeFact CheckViralसोलापूर-विजापूर रेल्वेमार्गावरील पुलाचा नाही हा व्हिडिओ, हे आहे सत्य

सोलापूर-विजापूर रेल्वेमार्गावरील पुलाचा नाही हा व्हिडिओ, हे आहे सत्य

Authors

सोलापूर- विजापूर रेल्वेमार्गावरील तडवळ स्टेशनजवळचा पूल भीमा नदीला आलेल्या महापुरात बुडाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. तीस सेंकंदाच्या या व्हिडिओत पुलावरील रुळावरुन पाणी जोराने वाहत असल्याचे दिसत आहे. पाच दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पुरस्थिती निर्माण झाली होती. शेकडो गावांचा संपर्क तुटला होता. शेतीचेही प्रचंड नुकसान झाले. याच दरम्यान रेल्वेपूलावरुन पाणी वाहत असल्याता व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

फेसबुक /संग्रहित

संग्रहित

Fact Check/Verification

आम्ही व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोलापूर- विजापूर रेल्वेमार्गावरील तडवळ स्टेशनजवळील पुलाचा आहे का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. यासाठी काही किवर्डसच्या आधारे शोध घेतला असता आम्हाला तडवळ रेल्वे स्टेशनजवळील पूर पाण्याखाली गेल्याची बातमी आढळली नाही.

यानंतर आम्ही व्हायरल व्हिडिओतील स्क्रीनशाॅट्स काढून रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने शोध घेतला असता आम्हाला युट्यूबवर नोव्हेंबर 2012 मध्ये अपलोड करण्यात आलेला 39 सेंकंदाचा व्हिडिओ आढळून आला. यात हा व्हिडिओ तुनी रेल्वे स्टेशनजवळील तांडव रेल्वे पुलाचा असल्याचे म्हटले आहे.

अधिक शोध घेतला असता आम्हाला हा व्हिडिओ आणखी एका युट्यूब चॅनलवर आढळून आला. यात म्हटले आहे की, आंध्रप्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील तुनी येथील तांडव रेल्वे पुलावरील 4 नोव्हेंबर 2012 रोजी सकाळी 9 वाजताचे हे दृश्य आहे.

याशिवाय आम्हाला The Hindu इंग्रजी वर्तमानपत्राच्या वेबसाईटवर 4 नोव्हेंबर 2012 रोजी आधंप्रदेशातील पूर्व गोदावरी, विशाखापट्टणम जिल्ह्यात पूरपरिस्थितीमुळे रेल्वे सेवा विस्कळित झाल्याची बातमी आढळून आली.

Conclusion

यावरुन हेच स्पष्ट होते की, सात वर्षापूर्वी आधंप्रदेशतील रेल्वे पूल पाण्याखाली गेल्याचा व्हिडिओ आॅक्टोबर 2020 मध्ये सोलापुर- विजापूर रेल्वेमार्गावरील भीमा नदीला आलेल्या पुरामुळे बुडालेल्या तडवळ पुलाचा असल्याच्या दाव्याने व्हायरल झाला.

Result- Misleading

Our Sources

Youtube- https://www.youtube.com/watch?v=2RhsdqQbo-M

The Hindu- https://www.thehindu.com/news/national/andhra-pradesh/trains-cancelled-many-areas-in-visakhapatnam-inundated/article4064355.ece

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular