Thursday, December 19, 2024
Thursday, December 19, 2024

HomeFact CheckViralयुपीत दिवाळीत फटाकेबंदी असताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आतिशबाजी केल्याचा दावा व्हायरल

युपीत दिवाळीत फटाकेबंदी असताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आतिशबाजी केल्याचा दावा व्हायरल

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

युपीत दिवाळीत फटाकेबंदी असताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आतिशबाजी केल्याचा दावा व्हायरल झाला आहे. या पोस्टमध्ये म्हटले आहे की, जेव्हा मुख्यमंत्री लोकांवर गायींचे रक्षण करण्यास अधिक दृढ असतात तेव्हा या गोष्टी घडणे बंधनकारक असते. पोस्टमधील व्हायरल व्हिडिओमध्ये एक मुलगी पोलिसांची गाडी अडवतना दिसत आहे यात विषयी म्हटले आहे की, मुलीच्या वडिलांना उत्तरप्रदेश पोलिसांनी पटाखे विक्री केली म्हणून अटक केली आहे, पोस्टमध्ये दुसरा व्हिडिओ मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा असून यात ते आतिशबाजी करताना दिसत आहे. पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, फटाके बंदी असताना देखील मुख्यमंत्र्यांनी आतिशबाजी केली.

संग्रहित

संग्रहित

Fact Check/Verification

आम्ही व्हायरल पोस्ट संदर्भात पडताळणी सुरु केली. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दिल्ली राजस्थान सह उत्तरप्रदेशमधील 13 जिल्ह्यांमध्ये फटाके फोडण्यास बंदी घातली होती. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण (एनजीटी) च्या सूचनेनंतर मुख्य सचिव आरके तिवारी यांनी 30 नोव्हेंबरपर्यंत बंदीचा आदेश जारी केला. यूपीच्या 13 जिल्ह्यांव्यतिरिक्त इतर जिल्ह्यात ग्रीन फटाके विक्री आणि फोडण्याची परवानगी होती. परंतु आम्हाला इंटरनेटवर योगी आदित्यनाथ यांनी फटाके फोडल्याची किंवा आतिशबाजी केल्याची बातमी आढळून आली नाही. त्यामुळे व्हायरल पोस्टमधील दाव्यासंदर्भात काही किवर्ड्सच्या साहाय्याने अधिक शोध घेण्यास सुरुवात केली असता आम्हाला एएनआयचे आॅगस्ट महिन्यातील ट्विट आढळून आले. यात योगी आदित्यनाथ यांचा तोच व्हायरल व्हिडिओ आहे जो दिवाळीमधील असल्याचा दावा केला जात आहे.

एएनआयच्या ट्वीटवरून हा व्हिडिओ लखनऊचा असल्याचे दिसून आले. अयोध्येत राम मंदिर शिलान्यास सोहळ्याच्या एक दिवस आधी उत्तर प्रदेशात दीपोत्सव साजरा करण्यात आला. त्याचवेळी सीएम योगी आदित्यनाथ यांनी फटाकेही फोडले होते. अधिक शोध घेतला असता आम्हाला न्यूज नेशन टिव्हीची बातमी आढळून आली.

Conclusion

यावरुन हेच सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओचा दिवाळीशी काही संबंध नाही. हा व्हिडिओ चुकीच्या दाव्यासह सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.

Result- Misleading

Our Sources

एएनआय- https://twitter.com/ANINewsUP/status/1290647003748274177

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा, अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar

Most Popular