Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
Claim
कसबा पोटनिवडणुकीत पराभवानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपलाच पक्ष भाजपाला घरचा आहेर दिला आहे.
Fact
हा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा आहे. स्वतः नितीन गडकरींनी प्रकाराबद्दल पोलिसात तक्रार दाखल केली असून आपल्या नावे केल्या जात असलेल्या या दाव्याचा इन्कार केला आहे.
महाराष्ट्राच्या पुणे येथील कसबा पोटनिवडणूक महाराष्ट्रातच नव्हे तर देशात गाजली आहे. या निवडणुकीत भाजप उमेदवाराचा पराभव झाला. यानंतर लगेचच केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांच्या नावे एक पोस्ट व्हायरल होत आहे. “फडणवीस नी एकनाथ शिंदे घेऊन मोठी चुक केली आहे का… नितिन गडकरी साहेब घरचा आहेर भेटायला सुरवात झाली” अशा कॅप्शन खाली ही पोस्ट केली जात असून या बरोबरीने नितीन गडकरी यांचा फोटो असलेले एक पोस्टरही जोडले जात आहे.

अनेक युजर्सनी फेसबुकवर तसेच व्हाट्सअप वर अशी पोस्ट केल्याचे आमच्या पाहणीत आले. “पुणे जिल्ह्यातील कसबा मध्ये झालेली निवडणूक ही भाजप साठी आत्मचिंतन करण्याची वेळ. खरच देवेंद्र फडणवीस नी एकनाथ शिंदे ना बरोबर घेऊन चूक तर नाही केली ना?? जनता कोणासोबत ही झालेला विश्वासघात खपवून घेत नाही.” असे विधान नितीन गडकरी यांनी केल्याचे ही पोस्ट सांगते.

या पोस्टचे संग्रहण आपण येथे पाहू शकता.
केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ भाजप नेते नितीन गडकरी यांनी खरेच असे विधान केले आहे का? याचा शोध आम्ही घेतला. ‘कसबा निवडणूक भाजप पराभव’ ‘नितीन गडकरी भाजपाला घरचा आहेर’ यासारखे कीवर्ड सर्च करून पाहिले असता आम्हाला काहीच हाती लागले नाही. नितीन गडकरी यांनी असे विधान केले असते तर नक्कीच त्याबद्दल बातम्या प्रसिद्ध झाल्या असत्या. मात्र आम्हाला असे कोणतेही मीडिया रिपोर्ट्ससुद्धा हाती लागले नाहीत.
आम्ही यावर आणखी शोध घेत असता आम्हाला ४ मार्च २०२३ रोजी प्रसिद्ध झालेली महाराष्ट्र टाइम्स ची एक बातमी मिळाली.

“पुण्यातील कसबापेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या निकालावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाने राज्यातील भाजप नेत्यांना कानपिचक्या देत असल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत गडकरी यांच्या कार्यालयाने बनावट पोस्ट असल्याचा खुलासा करून पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली. सर्व संबंधित पोस्टची सविस्तर माहितीही पोलिसांना सादर केली. या खोडसाळपणाबद्दल संबंधितांवर तत्काळ कठोर कारवाई करावी, अशी विनंती करण्यात आली.” असे आम्हाला या बातमीत वाचायला मिळाले.
याच आशयाचे एक वृत्त लोकमत ने ३ मार्च २०२३ रोजी प्रसिद्ध केल्याचेही पाहायला मिळाले. यावरून हे स्पष्ट झाले की व्हायरल पोस्ट मधील विधानांचा इन्कार करून नितीन गडकरी यांच्या कार्यालयाकडून यासंदर्भात कायदेशीर कारवाईला सुरुवात करण्यात आल्याचे आमच्या निदर्शनास आले.
याचबरोबरीने नितीन गडकरी यांच्या कार्यालयाकडून त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वरून याबद्दल माहिती देण्यात आली असल्याचेही आम्हाला दिसले.
यावरून हे स्पष्ट झाले की केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावे करण्यात आलेली व्हायरल पोस्ट पूर्णपणे चुकीची आणि दिशाभूल करणारी आहे.
पुणे येथील कसबा पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपने आत्मचिंतनाची गरज व्यक्त केली. तसेच फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना बरोबर घेऊन चूक केली. या आशयाचे विधान केल्याची पोस्ट पूर्णपणे खोटी आणि दिशाभूल करणारी असल्याचे आमच्या तपासात स्पष्ट झाले आहे.
Our Sources
News published by Maharasthra Times on March 4, 2023
News published by Lokmat on March 3, 2023
Tweet made by Office of Nitin Gadkari
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in
Runjay Kumar
December 4, 2025
Vasudha Beri
November 19, 2025
Runjay Kumar
November 17, 2025