Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
Claim
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घाबरून राहुल गांधींनी काँग्रेसला राजीनामा दिला.
Fact
हा दावा खोटा आहे. संबंधित दावा हा AI निर्मित ऑडिओ क्लोनिंगचा प्रकार असल्याचे उघड झाले आहे.
राहुल गांधींनी काँग्रेसला राजीनामा दिल्याचा दावा करणारा व्हायरल व्हिडिओ सर्वत्र पसरत आहे. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत काँग्रेस नेते राहुल गांधींचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांनी काँग्रेसचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचा दावा केला जात आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये राहुल गांधी हे राजीनामा पत्र वाचताना दिसत आहेत.
पोस्टचे संग्रहण येथे पाहता येईल.
व्हायरल व्हिडिओ सुमारे 32 सेकंदांचा आहे, ज्यामध्ये राहुल गांधी कथितपणे काँग्रेसचा राजीनामा देताना ऐकू येत आहेत. व्हायरल व्हिडिओ काळजीपूर्वक ऐकल्यावर, राहुल गांधींचा ऑडिओ त्यांच्या व्हिज्युअलशी जुळत नसल्याचे स्पष्ट होते. हे सूचित करते की हा व्हिडिओ एडिट केला गेला आहे.
मूळ व्हिडिओ शोधण्यासाठी, आम्ही त्याच्या मुख्य फ्रेम्सवर रिव्हर्स इमेज शोध घेतला आणि शोधात आम्हाला IANS या वृत्तसंस्थेच्या अधिकृत X हँडलवर 3 एप्रिल 2024 रोजी पोस्ट केलेली मूळ व्हिडिओ क्लिप सापडली, ज्यामध्ये राहुल गांधी वायनाड लोकसभा जागेसाठी आपला उमेदवारी अर्ज भरत असताना दिसत आहेत.

व्हिडिओसोबत दिलेल्या माहितीनुसार, ही पोस्ट केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधी यांच्या उमेदवारी अर्जाशी संबंधित आहे. व्हिडिओमध्ये राहुल गांधी भारतीय संविधान आणि देशाच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेची शपथ घेताना ऐकू येतात.
आणखी तपास करताना 3 एप्रिल 2024 रोजीच The Indian Express ने आपल्या अधिकृत वेबसाईटवर अपलोड केलेला व्हिडीओ आम्हाला सापडला. यामध्येही राहुल गांधी हे आपल्या वायनाड मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरत असतानाची व्हिज्युअल्स पाहायला मिळतात. संबंधित व्हिज्युअल्स आणि व्हायरल व्हिडिओमधील व्हिज्युअल्स समान असल्याचे आम्हाला पाहायला मिळाले.

राहुल गांधी यांनी आपल्या अधिकृत फेसबुक अकाउंटवर 3 एप्रिल 2024 रोजीच उमेदवारी अर्ज दाखल करतानाचा व्हिडिओ अपलोड केला आहे. या व्हिडिओमध्ये ते म्हणतात की, “मी राहुल गांधी, लोकसभेच्या जागेसाठी उमेदवार म्हणून नामांकन दाखल करत आहे.”
The Misinformation Combat Alliance (MCA) चे Deepfakes Analysis Unit (DAU), ज्याचा Newschecker हा एक भाग आहे अनेक deep fake detection tools द्वारे व्हायरल व्हिडिओ तपासला आणि त्या सर्वांनी असा निष्कर्ष काढला की काँग्रेस नेते राहुल गांधी व्हायरल व्हिडिओत ऐकू येणारी वाक्ये बोललेले नाहीत. संबंधित व्हिडीओ बनावट ऑडिओ वापरून एडिट करण्यात आला आहे.
संबंधित तपासात ConTrails AI, या बंगळुरूस्थित स्टार्टअपने व्हिडिओचे परीक्षण केले आणि असा निष्कर्ष काढला की व्हिडिओमधील भाषण पूर्णपणे A.I. व्युत्पन्न केलेले दिसते आणि व्हिडिओमधील आवाज A.I वापरून क्लोन करण्यात आला आहे. त्यांच्या परीक्षणात असेही नमूद केले की ही क्लिप पार्श्वभूमीतील ध्वनींमध्ये मिसळून ते वास्तविक ध्वनी भासवण्याचा प्रयत्न झालेले ऑडिओ क्लोनचे उदाहरण आहे.

तपासात IdentifAI, या सॅन फ्रान्सिस्को-आधारित डीपफेक सुरक्षा स्टार्टअपशी देखील संपर्क साधला गेला. त्यांचे ऑडिओ डिटेक्शन सॉफ्टवेअर वापरून, त्यांनी क्लिपमधील ऑडिओची सत्यता तपासली. त्यांनी राहुल गांधी यांच्या खऱ्या आवाजाच्या दोन नमुन्यांमधून गांधींच्या आवाजाचा एक ऑडिओ नमुना तयार केला आणि नंतर सर्व पार्श्वभूमीतील आवाज वेगळे करत व्हायरल व्हिडिओमधील आवाजाशी तुलना केली. त्यांच्या विश्लेषण आणि पुनरावृत्ती चाचण्यांच्या आधारे त्यांनी असा निष्कर्ष काढला की व्हायरल व्हिडिओ ऑडिओ डीपफेक एकत्र करण्याचा एक खराब प्रयत्न होता.
त्यांनी नमूद केले की व्हिडिओमधील noise masking हा ऑडिओ डीपफेकवर मुखवटा घालण्याचा हेतुपुरस्सर खराब प्रयत्न आहे. वास्तविक आणि बनावट ऑडिओमधील फरक कमी असून ते पाहणाऱ्यांच्या लक्षात येऊ शकतात.
heat-map analysis वापर करून संघाने वास्तविक आवाज आणि बनावट आवाजाची तुलना करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

मध्यवर्ती लाल आयतासह उजवीकडील प्रतिमा IdentifAI द्वारे तयार केलेल्या गांधींच्या आवाजाचा ऑडिओ नमुना हाताळलेल्या क्लिपमधील ऑडिओपेक्षा कसा वेगळा आहे हे हायलाइट करते. डावीकडील प्रतिमेत, गांधींच्या खऱ्या आवाजाच्या नमुन्याची तुलना IdentifAI द्वारे व्युत्पन्न केलेल्या ऑडिओ नमुन्याशी केली आहे, हिरवी वर्तुळे समानता दर्शवतात.
आमच्या सर्व निष्कर्षांवर आणि तज्ञांच्या विश्लेषणाच्या आधारे, आम्ही असा निष्कर्ष काढू शकतो की काँग्रेस नेते यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला असे कधीही सांगितले नाही आणि व्हिडिओ बनावट ऑडिओ वापरून एडिट केला गेला आहे.
अशाप्रकारे आमच्या तपासात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घाबरून राहुल गांधींनी काँग्रेसला राजीनामा दिला, हा दावा खोटा आहे. संबंधित दावा हा AI निर्मित ऑडिओ क्लोनिंगचा प्रकार असल्याचे उघड झाले आहे.
Our Sources
X post of IANS on April 3, 2024
Video report published by The Indian Express on April 3, 2024
Facebook post by Rahul Gandhi on on April 3, 2024
Factcheck by Deepfakes Analysis Unit (DAU) on April 18, 2024
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
Prasad S Prabhu
November 29, 2025
JP Tripathi
November 27, 2025
Salman
November 26, 2025