Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

HomeFact CheckWeekly Wrap: पंतप्रधान आणि तीनचा पाढा ते महिला पोलिस अधिका-याच्या व्हायरल फोटोपर्यंत

Weekly Wrap: पंतप्रधान आणि तीनचा पाढा ते महिला पोलिस अधिका-याच्या व्हायरल फोटोपर्यंत

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

या सप्ताहात Newschecker ने सोशल मीडियात व्हायरल झालेला अनेक फेक न्यूजचा पर्दाफाश केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शाळकरी मुलांसमोर तीनचा पाढा म्हणता आला नाही तसेच मुंबई पोलिसांत डीसीपी पदावर कार्यरत आयपीएस अधिकारी एन. अंबिका यांचा बालविवाह झाला होता, आणि खलबत्ता वरवंटे विकणारी महिला ही सहाय्यक पोलिस निरीक्षक पद्मशीला तिरपुडे आहेत. इत्यादी दावे या सप्ताहात व्हायरल झाले. हे आणि इतर दावे WhatsApp आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर व्हायरल होत आहेत. कदाचित आपणास देखील हे दावे पहायला मिळाले असतील. आपण इथे या सप्ताहातील टाॅप-5 फेक न्यूज वाचू शकता.

पंतप्रधान मोदी शाळकरी मुलांना तीनचा पाढा म्हणून दाखवू शकले नाहीत

बिहार निवडणूकीत भाजपाचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांना उद्देश्यून एक ट्विट करण्यात आले आहे. यात पंतप्रधान शाळकरी मुलांसमोर तीनचा पाढा म्हणू शकले नाहीत या बातमीचे कात्रण शेअर कऱण्यात आले आहे. हा दावा खोटा असल्याचे आढळून आले आहे. पंतप्रधानांना मुलांनी तीनचा पाढा म्हणण्यास सांगितलेले नव्हते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जुना फोटो एडिट करुन व्यंग्यात्मक बातमीचे कात्रण तयार करण्यात आले आहे. संपूर्ण फॅक्ट चेक इथे वाचा.

पुराच्या पाण्याचा व्हिडिओ सोलापूर-विजापूर रेल्वेमार्गावरील पुलाचा असल्याचा दावा

सोलापूर- विजापूर रेल्वेमार्गावरील तडवळ स्टेशनजवळचा पूल भीमा नदीला आलेल्या महापुरात बुडाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. पण पडताळणीत वेगळेच सत्य समोर आले. सात वर्षापूर्वी आधंप्रदेशतील रेल्वे पूल पाण्याखाली गेल्याचा व्हिडिओ आॅक्टोबर 2020 मध्ये सोलापुर- विजापूर रेल्वेमार्गावरील भीमा नदीला आलेल्या पुरामुळे बुडालेल्या तडवळ पुलाचा असल्याच्या दाव्याने व्हायरल झाला. संपूर्ण फॅक्ट चेक इथे वाचा.

आयपीएस अधिकारी एन.अंबिका यांचा बालविवाह झाल्याचा दावा

एन.अंबिका यांचा 14 व्या वर्षी बालविवाह झाला. पोलिस काॅन्स्टेबलशी लग्न झाले. पतीच्या मार्गदर्शन आणि साहाय्यामुळे त्या आयपीएस पदापर्यंत पोहचू शकल्या इत्यादी माहिती या पोस्टमध्ये देण्यात आली आहे. पडताळणीत आढळले की, आयपीएस अधिकारी एन. अंबिका यांचा बालविवाह झाला नसून त्यांचे ज्युनियर काॅलेजपर्यंतचे शिक्षण लग्नाआधीच पूर्ण झाले होते. याचे संपूर्ण फॅक्ट चेक इथे वाचा

बिहार निवडणुकीत भाजप-जेडीयूने दारुच्या बाटल्या वाटण्याची तयारी केली असल्याचा दावा

बिहार निवडणुकीत भाजप-जेडीयूने दारुच्या बाटल्या वाटण्याची तयारी केली असल्याच्या दाव्याने एक दारुच्या बाटल्यांचा साठ्याचा एक फोटो असलेली पोस्ट सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. पडताळणीत हा दावा असत्य असल्याचे आढळून आले. आहे. मागील वर्षी थायलंडमध्ये एका व्यक्तीने पुरादरम्यान लोकांना दारु व इतर सामग्री वाटली होती त्याचा हा फोटो आता बिहार निवडणुकीदरम्यान चुकीच्या दाव्याने व्हायरल झाला आहे. संपूर्ण फॅक्ट चेक इथे वाचा.

व्हायरल फोटो पोलिस अधिकारी पद्मशीला तिरपुडे यांचा असल्याचा दावा

या फोटोत एक महिला बाळाला पोटाशी घेऊन डोक्यावर दगडी खलबत्ता घेऊन उभ्या आहे. हा फोटो पद्मशीला यांचा असून भंडारा जिल्ह्यातील पद्मशीला तिरपुडे यांनी खलबत्ते, वरवंटे विकून संसार व मुलाला सांभाळूनयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेऊन MPSC ची PSI ची परीक्षा पास केली असा दावा केला जात आहे. पडताळणीत वेगळेच सत्य समोर आले. संपूर्ण फॅक्ट चेक इथे वाचा.

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा, अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.


Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Most Popular