Friday, November 22, 2024
Friday, November 22, 2024

HomeFact CheckWeekly Wrap : अरविंद केजरीवाल यांचे मशिदीत नमाज पठण ते दिग्विजय सिंह...

Weekly Wrap : अरविंद केजरीवाल यांचे मशिदीत नमाज पठण ते दिग्विजय सिंह यांचे कोरोना लसीबद्दल वक्तव्य

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

या सप्ताहात Newschecker ने सोशल मीडियात व्हायरल झालेला अनेक फेक न्यूजचा पर्दाफाश केला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नववर्षाच्या पहिल्या दिवशी जामा मशिदीत नमाज पठण केल्याचा फोटो व्हायरल झाला तर दुसरीकडे अटलबिहारी वाजपेयींचा लहानपणीचा फोटो देखील व्हायरल झाला. याशिवाय काॅंग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी कोरोना लस घेतल्याने नपुंसकत्व येते असे ट्विट केल्याचा दावा देखील सोशल मीडियात केला जात आहे. हे आणि इतर काही दावे WhatsApp आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर व्हायरल होत आहेत. कदाचित आपणास देखील हे दावे पहायला मिळाले असतील. आपण इथे या सप्ताहातील टाॅप फेक न्यूज वाचू शकता.

अरविंद केजरीवाल यांनी नववर्षाच्या पहिल्या दिवशी नमाज पठण केल्याचा फोटो व्हायरल

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नववर्षाच्या पहिल्या दिवशी जामा मशिदीत नमाज पठन केल्याचा दावा सोशल मीडियात व्हायरल होत आहे. पोस्टमध्ये केजरीवाल यांचा नमाज पठन करतानाचा फोटो शेअर केला असून यात म्हटले आहे की, वर्षाच्या पहिल्या दिवशी दिल्लीचे मालक श्री अरविंद केजरीवाल जामा मशिदीत जाऊन देश आणि दिल्लीसाठी दुवा मागितली. पण हे सत्य नाही. याचे संपूर्ण फॅक्ट चेक इथे वाचा.

अटलबिहारी वाजपेयींचा आईसोबत लहानपणीचा फोटो व्हायरल

भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींचा लहानपणीचा आईसोबत काढलेला एक फोटो असल्याचा दावा व्हायरल होत आहे. ब्लॅक अॅन्ड व्हाईट या फोटोत एक महिला आणि लहान मुलाचा फोटो आहे. पोस्टमध्ये म्हटले आहे की, आईच्या कुशीत अटलजी, जयंतीनिमित्त शतश: नमन. पण हा फोटो अटबिहारी वाजपेयी आणि त्यांच्या आईचा नसून मुझ्झफरनगरमधील गांधी स्वराज ट्रस्टचे चेअरमन राणू शंकर आणि त्यांच्या आईचा आहे. याचे संपूर्ण फॅक्ट चेक इथे वाचा.

व्हायरल फोटो सावित्रीबाई फुलेंनी पुण्यात सुरु केलेल्या पहिल्या मुलींच्या शाळेचा असल्यचा दावा

वित्रीबाई फुलेंनी पुण्यात सुरु केलेल्या पहिल्या मुलींच्या शाळेचा फोटो असल्याच्या दाव्याने एक मुलीच्यां ग्रुपचा फोटो व्हायरल होत आहे. या ब्लॅक अॅंड फोटोत काही छोट्या मुली भिंतीला खेटून असलेल्या बाकावर ओळीने बसल्याचे दिसत आहेत.  पण हा फोटो पाकिस्तानातील सिंध प्रांतातील मुलींच्या शाळेचा असलाचे सत्य समोर आले आहे. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

व्हायरल फोटो दिल्लीच्या सीमेवरील शेतकरी आंदोलनादरम्यानचा असल्याचा दावा

दिल्लीच्या सीमेवरील शेतकरी आंदोलनादरम्यान शेतक-यांचे हजारो तंबू सिंधू बाॅर्डरवर उभे राहिले असलेल्याच्या दाव्याने एक फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे. यात म्हटले आहे हा फोटो दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान टाकण्यात आलेला तंबुंचा आहे.  पण हे सत्य नाही हा फोटो 2013 च्या अलाहाबाद कुंभमेळ्यातील आहे. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

दिग्विजय सिंह यांनी कोरोना लसीमुळे नपुंसकत्व येत असल्याचे ट्विट केले असल्याचा दावा व्हायरल

काॅंग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी कोरोना लसीमुळे नपुंसकत्व येत असल्याचे ट्विट केले असल्याचा दावा करणारी पोस्ट सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. यात सिंह यांच्या हिंदीतील ट्विटचा स्क्रिनशाॅट शेअर करण्यात आला आहे.  पण पडताळणीत असे आढळून आले की, काॅंग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी कोरोना लस घेतल्याने नपुंसकत्व येत असल्याचे वक्तव्य किंवा ट्विट केलेले नाही. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा, अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Most Popular