Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

HomeFact CheckWeekly Wrap: आंदोलक शेतक-यांना पोलिस अधिका-याची बुटाने मारहाण ते अण्णा हजारेंचा भाजप...

Weekly Wrap: आंदोलक शेतक-यांना पोलिस अधिका-याची बुटाने मारहाण ते अण्णा हजारेंचा भाजप प्रवेश

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

या सप्ताहात Newschecker.in ने सोशल मीडियात व्हायरल झालेला अनेक फेक न्यूजचा पर्दाफाश केला. दिल्ली सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान पोलिस अधिका-याने आंदोलकांना बुटाने पायाखाली तुडवले असल्याचा दावा करणारा फोटो व्हायरल झाला. याशिवाय चीनने हवेत तरंगत मार्गक्रमण करणारी रेल्वे तयार केल्याचा दावा शिवाय मुंबई लोकलला पहिल्याच दिवशी तुफान गर्दी झाल्याचा व ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी भाजपात प्रवेश केल्याचा दावा करणारा फोटो देखील सोशल मीडियात शेअर होत आहे. हे आणि इतर काही दावे WhatsApp आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर व्हायरल होत आहेत. कदाचित आपणास देखील हे दावे पहायला मिळाले असतील. आपण इथे या सप्ताहातील टाॅप फेक न्यूज वाचू शकता.

पोलिस अधिका-याने शेतकरी आंदोलनादरम्यान आंदोलकांना बुटाने तुडवल्याचा फोटो व्हायरल

पोलिस अधिका-याने शेतकरी आंदोलनादरम्यान आंदोलकांना बुटाने तुडवल्याच्या दाव्याने एक फोटो व्हायरल होत आहे. यात एक आयपीएस अधिकारी एका जमिनीवर पडलेल्या युवकाच्या मानेवर तुडवत असल्याचे दिसत आहे. पोस्टमध्ये म्हटले आहे की, हा दिल्ली पोलिसांचा खरा चेहरा आहे. पण हे सत्य नाही. हा फोटो 10 वर्षापुर्वीचा आहे. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

हवेत तरंगणारी रेल्वेगाडी चीनमध्ये सुरू झालेली नाही, चुकीचा दावा व्हायरल

व्हायरल होत असलेल्या या मिनिटे 32 सेंकंदांच्या व्हिडिओत अनेक रेल्वेगाड्या हवेतून येउन रेल्वे रुळावर उतरुन पुढे धावताना दिसत आहेत. पोस्टमध्ये म्हटले आहे की, “हवेत तरंगत मार्गक्रमण करणारी रेल्वेगाडी चीनमधे सुरू झाली असून तिला चाके नाहीत, पण हे सत्य नाही. व्हायरल व्हिडिओ चीनमधील तरंगणा-या रेल्वेगाडीचा नसून एका व्हिडिओ गेमधील दृश्य आहे. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिगं इथे वाचा.

व्हायरल व्हिडिओ दहा महिन्यानंतर मुंबई लोकल सुरु झाल्यानंतर बोरिवली स्थानकात तुफान गर्दी

दहा महिन्यानंतर मुंबई लोकल सुरु झाल्यानंतर बोरिवली स्थानकात तुफान गर्दी झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. पोस्ट मध्ये दावा करण्यात येत आहे की, मुंबई लोकल सुरु झाल्याच्या पहिल्या दिवशी बोरिवली रेल्वे स्थानकात अशी तुफान गर्दी झाली.  पण हे सत्य नाही. व्हायरल व्हिडिओ लोकल ट्रेन सर्वसामान्यांसाठी 1 फेब्रुवारी रोजी सुरु झाल्याच्या दिवशीचा नाही तर पाच वर्षांपुर्वीचा आहे. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

पेट्रोल,डिझेलच्या दरांविषयी भाजप नेते सुब्रमण्यम स्वामींनी केला चुकीचा दावा

पेट्रोल, डिझेलच्या दरांविषयी भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केलेला दावा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.स्वामी यांनी रामाच्या भारतात पेट्रोल 93 रुपये तर रावणाच्या लंकेत 51 रुपये प्रतिलीटर मिळत आहे तर सीतेच्या नेपाळमध्ये 53 रुपये मिळते असे म्हटले आहे. पण हे सत्य नाही. या दोन्ही देशात जास्त किमतीला पेट्रोल विकले जाते. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

अण्णा हजारे यांनी भाजपात प्रवेश केलेला नाही, चुकीचा दावा व्हायरल

ज्येष्ठ समाजसेववक अण्णा हजारे यांनी भाजपात प्रवेश केला असल्याचा एक फोटो व्हायरल होत आहे. यात भाजप नेते जे. पी नड्डा आणि अण्णा हजारे यांचा हा फोटो असून यात अण्णांनी भारतीय जनता पार्टीचे उपरणे गळ्यात अडकविले असल्याचे दिसत आहे. पण हे सत्य नाही हे आमच्या पडताळणीत आढळून आले.ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या भाजप प्रवेशाचा जुनाच फोटो एडिट करुन अण्णा हजारे यांनी भाजप प्रवेश केला आहे असे भासविण्यात आले आहे. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा, अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Most Popular