Tuesday, November 19, 2024
Tuesday, November 19, 2024

HomeFact CheckWeekly Wrap : दिल्ली मेट्रोत महिलेला मारहाण ते पाकिस्तानच्या संसदेत मोदी-मोदीच्या घोषणा

Weekly Wrap : दिल्ली मेट्रोत महिलेला मारहाण ते पाकिस्तानच्या संसदेत मोदी-मोदीच्या घोषणा

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

या सप्ताहात Newschecker ने सोशल मीडियात व्हायरल झालेला अनेक फेक न्यूजचा पर्दाफाश केला. दिल्ली मेट्रोच्या लिफ्टमध्ये एका महिलेला अमानुष मारहाण करण्यात आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला शिवाय मास्कवर 18 टक्के जीएसटी आकारण्यात येत असल्याचा दावा देखील व्हायरल झाला या शिवाय पाकिस्तानच्या संसदेत मोदी-मोदी अशा घोषणा देण्यात आल्याचा दावाही या सप्ताहात व्हायरल झाला. हे आणि इतर दावे WhatsApp आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर व्हायरल होत आहेत. कदाचित आपणास देखील हे दावे पहायला मिळाले असतील. आपण इथे या सप्ताहातील टाॅप-5 फेक न्यूज वाचू शकता.

दिल्ली मेट्रोच्या लिफ्टमध्ये महिलेला मारहाण झाल्याचा दावा

लिफ्टमध्ये महिलेला मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून दावा करण्यात येत आहे की, हा व्हिडिओ दिल्ली मेट्रोचा आहे. व्हायरल होत असलेल्या 56 सेंकदाच्या या व्हिडिओत एक महिला लिफ्ट मध्ये प्रवेश करते व तिच्यापाठोपाठ एक पुरुष देखील लिफ्टमध्ये शिरतो. लिफ्ट सुरु होताच तो पुरुष महिलेल्या लाथाबुक्क्यांनी मारहाण करायला सुरुवात करतो. पडताळणीत ही घटना मलेशियातील असल्याचे आढळले. संपूर्ण फॅक्ट चेक इथे वाचा.

टिव्ही 9 मराठीने देवेेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात चुकीचे वृत्त दिल्याचा दावा

टिव्ही 9 मराठी न्यूज चॅनलच्या बातमीचा एक स्क्रीनशाॅट व्हायरल झाला आहे. यात कोरोनाला देवेंद्र फडणवीसांची लागण असे लिहिल्याचे आढळते. दावा करण्यात येत आहे की, ब्रेकिंग न्यूजच्या नादात ही हेडिंग टिव्ही 9 च्या पडद्यावर दिसली होती. पण हे सत्य नाही. टिव्ही 9 मराठीच्या बातमीत बदल करुन चुकीचा स्क्रीनशाॅट व्हायरल करण्यात आला आहे. याबाबत सायबर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. संपूर्ण फॅक्ट चेक इथे वाचा.

मास्कवर 18 टक्के जीएसटी आकारण्यात येत असल्याचा दावा

मास्कवर 18 टक्के जीएसटी आकारण्यात येत असल्याचा सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. व्हायरल पोस्टमध्ये “जे मास्क आणि सॅनिटायझरवर 18 टक्के लावतात ते लस फुकट देतील का?” असा सवाल देखील करण्यात येत आहे. पडताळणीत वेगळेच सत्य समोर आले आहे. मास्कवर 18 टक्के जीएसटी आकारण्यात येत नाही. सोशल मीडियात चुकीची माहिती शेअर केली जात आहे. संपूर्ण फॅक्ट चेक इथे वाचा

पाकिस्तानच्या संसदेत मोदी- मोदी अशा घोषणा देण्यात आल्याचा दावा

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी हे संसदेत बोलायला उभे राहिले असताना काही संसद सदस्य मोदी-मोदीच्या घोषणा देत आहेत आहेत हे व्हायरल व्हिडिओत दिसून येते. पण हा व्हि़डिओ एडिट केला आहे. पाकिस्तान संसदेत व्होटिंग व्होटिंग अशा घोषणा देण्यात आल्या. पाकिस्तानी संसदेत मोदी-मोदी अशा घोषणा देण्यात आल्याचा दावा चुकीचा आहे. याचे संपूर्ण फॅक्ट चेक इथे वाचा…..

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा, अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar

Most Popular