Authors
सोशल मीडियावर गेल्या आठवड्यातही व्हायरल फेक क्लेम्सची जोरात चर्चा झाली. बेळगावात महिलेची नग्न परेड प्रकरणी उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करेतोवर सरकारने कोणतीही कारवाई केली नाही, असा दावा करण्यात आला. अयोध्येतील राममूर्ती निर्मितीचे काम मुस्लिम कुटुंबीयांकडे देण्यात आले आहे, हा दावा करण्यात आला. काँग्रेस नेते राहुल गांधी स्वतःला शिंपी म्हणवतात, असा दावा करण्यात आला. संपूर्ण भारतातील प्रकरणांमध्ये अलीकडे वाढ झाली असताना नवीन कोरोनाव्हायरस प्रकाराबद्दल नागरिकांना सावध करणारी अडव्हायजरी असे सांगत एक दावा व्हायरल करण्यात आला. अयोध्या येथील श्रीराम मंदिराचा असल्याचे सांगून एक व्हिडीओ व्हायरल करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये पाहता येणार आहेत.
नग्न परेड प्रकरणी उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करेतोवर सरकारने कारवाई केली नाही?
बेळगावात महिलेची नग्न परेड प्रकरणी उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करेतोवर सरकारने कोणतीही कारवाई केली नाही. असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
अयोध्येतील राममूर्ती निर्मितीचे काम मुस्लिम कुटुंबीयांकडे?
अयोध्येतील राममूर्ती निर्मितीचे काम मुस्लिम कुटुंबीयांकडे देण्यात आले आहे. असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा आढळला.
राहुल गांधी यांनी स्वतःला शिंपी म्हणवून घेतले नाही
राहुल गांधी यांनी स्वतःला शिंपी म्हणवून घेतले, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा चुकीच्या संदर्भाने करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.
ही अडव्हायजरी खरी नाही
संपूर्ण भारतातील प्रकरणांमध्ये अलीकडे वाढ झाली असताना नवीन कोरोनाव्हायरस प्रकाराबद्दल नागरिकांना सावध करणारी अडव्हायजरी आहे असे सांगत एक टेक्स्ट मेसेज व्हायरल झाला. आमच्या तपासात हा प्रकार दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले.
व्हायरल व्हिडीओ राम मंदिराचा नाही
अयोध्या येथील राम मंदिराचा व्हिडीओ असे सांगून एक संदेश व्हायरल झाला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे निदर्शनास आले.
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा