Authors
लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि असंख्य दावे सोशल मीडियावर व्हायरल झाले. भाजपचा विजय साजरा करण्यासाठी, नरेंद्र मोदी सर्व भारतीय युजर्सना ₹719 चे 84 दिवस मोफत रिचार्ज देत आहेत, असा दावा करण्यात आला. निवडणूक निकालानंतर पश्चिमी उत्तर प्रदेशातील मुस्लिम लोक राजपूतांच्या घरासमोर अश्लील हातवारे करत आहेत, असा दावा करण्यात आला. काँग्रेसच्या महालक्ष्मी योजनेंतर्गत 8,500 रुपये मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या महिलांनी रांक लावली आहे, असा दावा करण्यात आला. लोकसभा निवडणुकीत यूपीमधील अनपेक्षित पराभवानंतर योगी आदित्यनाथ म्हणाले की, देशातील साधनसंपत्तीवर मुस्लिमांचा पहिला हक्क आहे, असा दावा करण्यात आला. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीनंतर संसदेत एकूण संख्याबळाच्या 20% म्हणजेच 110 मुस्लिम खासदार निवडून आले, असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.
नरेंद्र मोदी सर्व भारतीय युजर्सना मोफत रिचार्ज देत आहेत?
भाजपचा विजय साजरा करण्यासाठी, नरेंद्र मोदी सर्व भारतीय युजर्सना ₹719 चे 84 दिवस मोफत रिचार्ज देत आहेत, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा आढळला.
अश्लील हावभाव आणि घोषणाबाजी करणाऱ्या व्यक्तींचा हा व्हिडिओ महाराष्ट्रातील
निवडणूक निकालानंतर पश्चिमी उत्तर प्रदेशातील मुस्लिम लोक राजपूतांच्या घरासमोर अश्लील हातवारे करत आहेत, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
रांकेत थांबलेल्या महिला महालक्ष्मी योजनेसाठी नव्हेत
काँग्रेसच्या महालक्ष्मी योजनेंतर्गत 8,500 रुपये मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या महिलांनी रांक लावली आहे, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले.
देशातील साधनसंपत्तीवर मुस्लिमांचा पहिला हक्क असे योगी म्हणाले नाहीत
लोकसभा निवडणुकीत यूपीमधील अनपेक्षित पराभवानंतर योगी आदित्यनाथ म्हणाले की, देशातील साधनसंपत्तीवर मुस्लिमांचा पहिला हक्क आहे, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे निदर्शनास आले.
110 मुस्लिम खासदार लोकसभेवर निवडून आले?
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीनंतर संसदेत एकूण संख्याबळाच्या 20% म्हणजेच 110 मुस्लिम खासदार निवडून आले, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे दिसून आले.
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा