Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
Claim
अग्निशामक दलाचे जवान लॉस अँजेलिस मधील आगीतून प्राण्यांना वाचविताना.
Fact
व्हायरल व्हिडीओ खरा नसून AI जनरेटेड आहे.
अग्निशामक दलाचे जवान लॉस अँजेलिस मधील आगीतून प्राण्यांना वाचविताना असे सांगणारा व्हिडीओ मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला आहे. प्रचंड आगीतून काही प्राण्यांना गणवेश घातलेले जवान वाचवत असल्याचे व्हिडिओत दिसते.
“लॉस एंजेलिस च्या जंगलाला दि ९ जानेवारी रोजी लागलेल्या आगीत घरे जाळली त्याचबरोबर झाडांनाही पेट घेतला. या आगीत वित्तहानी झाली असून या आगीत अनेक प्राणी देखील जखमी झाले आहेत. त्यांना वाचवण्यासाठी अग्निशमन दलाचे पथक धावून आले आहे.” अशा कॅप्शनखाली प्रहार न्यूजलाईन सारख्या माध्यमांनी हा व्हिडीओ पोस्ट केला असल्याचे आमच्या निदर्शनास आले.


वर्षाच्या सुरुवातीलाच अमेरिकेच्या लॉस अँजेलिसमध्ये पेटलेल्या वणव्याच्या बातम्यांनी सारे जग हळहळले. दरम्यान या घटनेतील प्रत्यक्षदर्शी पुरावे असे सांगत काही फोटो आणि व्हिडिओही व्हायरल झाले असून याच क्रमाने हा व्हिडीओ सोशल मीडियावर फिरत आहे.
दाव्याची पडताळणी करण्यासाठी, आम्ही व्हायरल व्हिडिओच्या किफ्रेम्स काढून त्यावर रिव्हर्स इमेज सर्च केले. दरम्यान आम्हाला futureriderus या Instagram अकौन्टने ११ जानेवारी २०२५ रोजी हाच व्हिडोओ पोस्ट केला असल्याचे आम्हाला दिसून आले.

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये आम्हाला “नायक फक्त जीव वाचवत नाहीत, तर ते शक्य तितक्या आत्म्यांना वाचवतात. अग्निशमन दलाच्या जवानांनो, निष्पापांचे रक्षण केल्याबद्दल धन्यवाद.” अशी माहिती मिळाली. संबंधित व्हिडीओ ‘AI’ शी संलग्न केला असल्याची माहितीही आम्हाला मिळाली. व्हीडीओ AI तंत्रज्ञानाशी संलग्न असल्यासच असे लेबल येते आणि ते जाहीरपणे दाखविले जाते अशी Instagram पॉलिसीसुद्धा आम्हाला वाचायला मिळाली.

विशेष म्हणजे futureriderus या Instagram अकौन्टने हा एकच नव्हे तर असे असंख्य AI जनरेटेड व्हिडीओ पोस्ट केले असल्याचे आम्हाला दिसून आले.

इतक्या तपासावरून संबंधित व्हिडीओ AI तंत्राचा वापर करूनच तयार केला असल्याचे आणि वास्तविक नसल्याचे स्पष्ट झाले. तरीही मीडिया AI जनरेटेड आहे किंवा नाही हे तपासणाऱ्या hivemoderation या टूलवर आम्ही हा व्हिडीओ तपासून पाहिला. दरम्यान संबंधित व्हिडीओ AI जनरेटेड असण्याची शक्यता ९६.४ टक्के असल्याची माहिती मिळाली.

यावरून आम्हाला संबंधित व्हिडीओ खरा नसल्याचे स्पष्टपणे सांगता येते.
अशाप्रकारे आमच्या तपासात अग्निशामक दलाचे जवान लॉस अँजेलिस मधील आगीतून प्राण्यांना वाचविताना असे सांगणारा व्हायरल व्हिडीओ खरा नसून AI जनरेटेड असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Our Sources
Video uploaded by futureriderus on January 11, 2025
Self Ananlysis
Detection on Hive Moderation
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
Salman
November 26, 2025
JP Tripathi
November 24, 2025
Prasad S Prabhu
November 18, 2025