Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

HomeFact Checkयोगी आदित्यनाथ यांनी हाथरस पिडितेवरील अंंत्यंसंस्कार लाईव्ह बघितले नाही, खोटा दावा व्हायरल

योगी आदित्यनाथ यांनी हाथरस पिडितेवरील अंंत्यंसंस्कार लाईव्ह बघितले नाही, खोटा दावा व्हायरल

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हाथरस पिडितेवरील अंंत्यंसंस्कार लाईव्ह बघत असल्याचा एक फोटो व्हायरल होत आहे. यात योगी आदित्यनाथ लॅपटाॅपवर चिता जळताना पाहत असल्याचे दिसते. पोस्टमध्ये म्हटले आहे की, हाथरस पिडितेला युपी पोलिसांनी कसे जिंवत जाळले त्याचा लाईव व्हिडिओ पाहताना एक नाकाम मुख्यमंत्री.

संग्रहित

Fact Check / Verification

आम्ही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या व्हायरल होत असलेल्या फोटोबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. रिव्हर्स इमेजचा मदतीने या फोटोचा शोध घेतला असता एनएनआयचे एक ट्विट आढळून आले ज्यात योगी आदित्यनाथ यांचा हाच फोटो दिसून आला मात्र यात लॅपटाॅपची स्क्रीन ब्लर करण्यात आलेली आहे. एनएनआयच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित मुलीच्या कुटुंबियांंशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बातचीत केली.

याशिवाय Zee News ची बातमी देखील आढळून आली. योगी आदित्यनाथ यांनी कुटुंबियांना २५ लाख रुपये, कुटुंबातील एका व्यक्तीस कनिष्ठ सहायक पदावर नोकरी देण्याचे आश्वासन दिले. तसेच हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल तसेच कुटुंबियांना हाथरस शहरात एक घर देखील देण्यात येईल असे या लाईव व्हिडिओ संवादा दरम्यान सांगिल्याचे बातमीत म्हटले आहे.

व्हायरल फोटोतील लॅपटाॅपवरील अंत्यसंस्काराचे दृश्य नेमके कुठले आहे याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला असता आम्हाला इंडिया टुडे च्या पत्रकार तनुश्री पांडे यांंचे एक टविट आढळून आले. यात त्यांनी पीडितेच्या अंत्यंस्काराचा फोटो शेअर केला आहे व पोलिसांनी पीडितेच्या कुटुंबियांना आणि स्थानिकांना घरात कोंडून पीडितेचे अंत्यसंस्कार पार पाडले. कुटुंबाला त्यांच्या मुलीचे अंत्यदर्शन देखील घेऊ दिले नाही असे ट्विटमध्ये म्हटले आहे.

यावरुन हेच लक्षात येते की हाथरस पिडितेचा अंत्यसंस्काराच्या व्हिडिओतील दृश्याचा स्क्रिनशाॅट योगी आदित्यनाथ यांच्या लॅपटाॅपवर एडिट करुन लावण्यात आला आहे आणि सोशल मीडियात चुकीच्या दाव्याने व्हायरल होत आहे. आम्ही दोन्ही फोटोंची तुलना करुन पाहिली असता बारकाईने पाहिले असता लॅपटाॅपवरील फोटो एडिट केल्याचे स्पष्टपणे दिसते.

Conclusion

यावरुन हेच सिद्ध होते की योगी आदित्यनाथ यांचा फोटो एडिट करुन चुकीचा दावा व्हायरल केला जात आहे. योगींनी पीडितेचे अत्यसंस्कार लाईव्ह बघितले नव्हते तर तिच्या कुटुंबियांशी व्हिडिओ काॅन्फरन्स द्वारे बातचीत करुन मदतीची घोषणा केली होती.

Result:Misleading

Our Sources

zee News- https://zeenews.india.com/hindi/india/cm-yogi-speaks-to-the-family-of-hathrass-victim-the-matter-will-be-heard-in-fast-track-court/757510

ANI- https://twitter.com/ANINewsUP/status/1311285033718542337

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा, अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar

Most Popular