Authors
Claim
योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रात बुलडोझरवर स्वार होऊन प्रचार केला.
Fact
व्हिडिओमध्ये जेसीबीवर योगी आदित्यनाथ नाहीत.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये योगी आदित्यनाथ यांच्या वेशात एक व्यक्ती जेसीबीवर उभा आहे. योगी आदित्यनाथ यांनी बुलडोझरवर स्वार होऊन महाराष्ट्रात प्रचार केल्याचा दावा करत हा व्हिडिओ शेअर केला जात आहे.
मात्र, आमच्या तपासात आम्हाला आढळून आले की, व्हिडिओमधील व्यक्ती योगी आदित्यनाथ नसून संतोष धुळे हा अकोल्यातील भाजपचा स्थानिक कार्यकर्ता आहे.
हा व्हिडिओ सुमारे 33 सेकंदांचा आहे, ज्यामध्ये दोन लोक जेसीबीवर उभे असल्याचे दिसत आहेत. यातील एकाने योगी आदित्यनाथ यांच्यासारखा पोशाख घातला आहे. यादरम्यान जेसीबीवर स्वार असलेले दोघेही तेथे उपस्थित लोकांना अभिवादन करताना दिसत आहेत.
व्हायरल दावा करत हा व्हिडिओ फेसबुकवर शेअर करण्यात आला आहे.
Fact Check/ Verification
व्हायरल व्हिडिओची चौकशी करण्यासाठी न्यूजचेकरने संबंधित कीवर्डस Google वर शोधले. यावेळी, आम्हाला ABP Majha च्या YouTube चॅनेलवर 6 नोव्हेंबर 2024 रोजी प्रकाशित झालेला व्हिडिओ रिपोर्ट सापडला.
या व्हिडिओ रिपोर्टमध्ये व्हायरल झालेल्या व्हिडिओचे दीर्घ सीक्वेन्स होते आणि हा व्हिडीओ श्रेय अकोल्याचा असल्याचे सांगण्यात आले होते. व्हिडिओ नीट पाहिल्यानंतर जेसीबीवरील भगव्या कपड्यातील व्यक्ती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ नसल्याचे आढळून आले.
दरम्यान, आम्हाला 7 नोव्हेंबर 2024 रोजी लोकसत्ता या मराठी दैनिकाच्या वेबसाइटवर प्रकाशित झालेला रिपोर्ट देखील आढळला. यात, व्हायरल व्हिडिओमधील दृश्ये फिचर इमेज म्हणून वापरण्यात आल्याचे दिसून आले.
6 नोव्हेंबर 2024 रोजी योगी आदित्यनाथ यांनी मूर्तिजापूर, अकोला येथे एका जाहीर सभेला संबोधित केल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आले. ते हेलिकॉप्टरने जाहीर सभेला पोहोचले. यावेळी त्यांनी 20 मिनिटे जाहीर सभेला संबोधित केले. यानंतर ते तेथून निघून गेले. ते निघू लागल्यावर मूर्तिजापूरमधील भाजपचे उमेदवार हरीश पिंपळे हे योगी आदित्यनाथ यांच्या वेशातील व्यक्तीसह जेसीबीवर चढले आणि मिरवणूक काढली.
योगी आदित्यनाथ यांच्यासारखे कपडे घातलेल्या व्यक्तीचे नाव संतोष धुळे असे असून तो मूर्तिजापूरमधील तेलीपुरा येथील रहिवासी असून भाजपचा स्थानिक कार्यकर्ता असल्याचेही या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.
आमच्या तपासात आम्ही भाजप उमेदवार हरीश पिंपळे यांच्याशी संपर्क साधण्याचाही प्रयत्न केला आहे, त्यांनी प्रतिसाद दिल्यावर हा लेख अपडेट केला जाईल.
Conclusion
अशाप्रकारे आमच्या तपासात योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रात बुलडोझरवर स्वार होऊन प्रचार केला हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
Result: False
Our Sources
Video by ABP Majha on 6th Nov 2024
Article by Loksatta on 7th Nov 2024
(हे आर्टिकल सर्वप्रथम न्यूजचेकर हिंदीसाठी रुंजय कुमार यांनी केले असून ते इथे वाचता येईल.)
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा