Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
Claim
अंमली पदार्थांचे सेवन केल्यानंतर तरुणीने पोलिसांसोबत गैरवर्तन केले.
Fact
मंगळुरू पोलिसांनी स्पष्ट केले की, तरुणीने ड्रग्स घेतल्याचे चाचणीत आढळले नाही आणि तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अंमली पदार्थांचे सेवन केल्यानंतर तरुणीने पोलिसांसोबत गैरवर्तन केले, असे सांगणारा दावा सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आम्हाला हा दावा व्हाट्सअपवर आढळला.
“ह्या मुलीने मादक पदार्थाचं सेवन केलंय आणि तिच्या आई वडिलांनीच तिला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ही मुलगी ६ पोलिसांना सुद्धा भारी पडतेय तर तिच्या आई वडिलांना किती त्रास झाला असेल ??? आपल्या मुलांची काळजी घ्या. मुलं कुठे जातात ? काय करतात ? त्यांचे मित्र कोण आहेत ? या कडे पण लक्ष ठेवा मुलांना रात्रभर मित्रांच्या घरी पाठवतो त्याचा हा परिणाम आहे.” असे हा दावा सांगतो.
आम्ही फॅक्ट शोधण्यासाठी Google कीवर्ड शोध घेतला. दरम्यान, मंगळुरू येथील या घटनेची बातमी आम्हाला पाहायला मिळाली.
DaijiWorld च्या 10 सप्टेंबर 2023 च्या बातमीत म्हटले आहे की, “एका तरुणीने एका महिला पोलिसाला लाथ मारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.” व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना, मंगळुरू शहर पोलिस आयुक्त म्हणाले की, “उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी एका तरुणीला 1 सप्टेंबर रोजी पंपवेलमधील एका मेडिकल शॉपमध्ये गैरवर्तन केल्यावरून ताब्यात घेतले होते. पोलीस स्थानकात आल्यावर पुन्हा आक्रमक झाल्याने पोलिसांच्या मदतीने तिला रुग्णालयात नेण्यात आले. अंमली पदार्थ सेवनाच्या संशयावरून तिची चाचणी केली असता, ती निगेटिव्ह आली आणि नंतर तिच्या पालकांनी तिला वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले,” असे त्यांनी सांगितले.
Mangalorean.com ने 9 सप्टेंबर रोजी प्रकाशित केलेल्या बातमीत पोलिसांच्या स्पष्टीकरणाचा उल्लेख “सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोलिसांसोबत तरुणीच्या गैर वर्तनाच्या व्हिडिओवर स्पष्टीकरण” असा केला आहे.
10 सप्टेंबर 2023 रोजीच्या ETV भारतच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे, “मंगळुरुचे पोलिस आयुक्त अनुपम अग्रवाल यांनी स्पष्ट केले आहे की आक्रमकपणे वागणारी महिला व्यसनी नव्हती.”
या प्रकरणासंदर्भात आम्ही मंगळुरू शहर पोलिसांच्या फेसबुक पेजची दखल घेतली आहे.
“सोशल मीडियावर प्रसारित होत असलेल्या व्हिडिओमध्ये संबंधित तरुणी अंमली पदार्थाचे सेवन करून गैरवर्तन केल्याचे सांगितले जात आहे. मंगळुरु पूर्व पोलिस स्टेशनमध्ये घडलेल्या या घटनेत तिने अंमली पदार्थांचे सेवन केल्याचे सिद्ध करण्यासाठी कोणतेही सकारात्मक रिपोर्ट मिळालेले नाहीत. तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.” असे त्यात म्हटले आहे.
अशाप्रकारे आमच्या तपासात, सदर तरुणी अंमली पदार्थांचे सेवन केल्याने पोलिसांशी गैरवर्तन करीत होती, हा दावा खोटा आहे.
Our Sources
Report By Daijiworld.com, Dated: September 10, 2023
Report By Mangalorean.com, Dated: September 9, 2023
Report By Etv Bharat, Dated September 10, 2023
Facebook Post By Mangaluru city police, Dated: September 9, 2023
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा