Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
अॅंटिलिया स्फोटक प्रकरणात अटकेत असलेल्या सचिन वाझेच्या फ्लॅटमधून अमाप सपंत्ती जप्त करण्यात आल्याचा फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. या फोटोत सोन्याची बिस्किटे दागिने आणि 2000 रुपयांच्या नोटांचा ढिग दिसत आहे.
आमच्या एका वाचकाने व्हाट्सअपद्वारे हे फोटो आम्हाला पाठवून याबाबत सत्यता पडताळणी करण्याची विनंत केली.
अधिक शोध घेतला असता आम्हाला ही एक फेसबुक पोस्ट देखील याच दाव्याने शेअर करण्यात आल्याची दिसून आली.
crowdtangle वर या पोस्टच्या संदर्भात 30 इंट्रेक्शन्स आढळून आले आहेत.
सचिन वाझेच्या ठाण्यातील फ्लॅटमध्ये खरंच एवढी संपत्ती आढळून आली आहे का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला असता आम्हाला ईटीव्ही भारतची बातमी आढळून आली यात म्हटले आहे की, मनसुख हिरेन मृत्युप्रकरणात एटीएस पथकाने दोन आरोपीना अटक केल्यानंतर आणि त्यांना ३० मार्च पर्यंत पोलीस कोठडीत ठेवल्याने आता चौकशीत धक्कादायक खुलासे आणि अनेकांची नावे पुढे येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एटीएसच्या दोन पथकांनी ठाण्यात सचिन वाझे यांच्या व्यावसायिक ऑफिस आणि गाळे यांच्यावर छापेमारी केली. त्यांच्या मोटोजर्सन ऑटोमोबाईल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या भिवंडीतील गोदामावरही छापेमारी केली.
मात्र या बातमीत कुठेही अमाप संपत्ती जप्त केल्याची माहिती दिलेली नाही. त्यामुळे आम्ही व्हायरल पोस्टमधील फोटो नेमके कुठले आहेत याता शोध घेण्याचा प्रयत्न केला. Google Reverse Image च्या साहाय्याने या फोटोंचा शोध घेतला असता हे फोटो सचिन वाझेच्या फ्लॅटवरील कारवाई दरम्यानचे नसल्याचे सत्य समोर आले.
फोटो क्रमांक 1-
हा फोटो द्रमुक पक्षाचे अध्यक्ष स्टॅलिन यांच्या जावयाच्या चेन्नईमधील आॅफिसवर आयकर विभागाने टाकलेल्या धाडी दरम्यानचा आहे. याबाबत The Hindu या वेबसाईटवर हा फोटो आढळून आला.
फोटो क्रमांक 2.
हा फोटो तेलंगणात नोटा बदलून देणा-या टोळीडून जप्त करण्यात आलेल्या 2000 रुपयांच्या नोटांचा आहे.
फोटो क्रमांक- 3
हा फोटो तामिळनाडूमध्ये दोन वर्षापूर्वी टाकलेल्या धाडीचा आहे. इंडिया टिव्हीच्या बातमीनुसार तामिळनाडूच्या वेल्लोर येथील प्राप्तिकर विभागाच्या पथकाने सिमेंटच्या गोदामात छापा टाकला, तेथून त्याला प्रचंड रक्कम मिळाली. जात आहे की हे प्रकरण डीएमके नेत्याशी संबंधित आहे, परंतु याची पुष्टी झालेली नाही. गोदामात सापडलेल्या रोख रकमेचा अंदाज अनेक पोत्यात आणि पुठ्ठ्यांच्या बॉक्समध्ये भरलेल्या नोटांवरुन काढता येतो.
फोटो क्रमांक 4
फोटो तामिळनाडूमधील रस्ते बांधकाम फर्मच्या एका जागेवर छापे टाकून प्राप्तिकर विभागाने १33 कोटी रुपयांची रोकड आणि सुमारे 100 किलो ज्वेलरी जप्त केली असल्याचा आहे. ही कारवाई 2018 मध्ये करण्यात आली होती. outlook ने याबाबत वृत्त दिले होते.
फोटो क्रमांक- 5
हा फोटो कर्नाटकमधील हुबळी जिल्ह्यात जिल्ह्यात 2016 साली आयकर विभागाच्या धाडीत जप्त केलेल्या 5. 17 कोटींच्या नव्या 2000 रुपयांच्या नोटा जप्त केल्याचा आहे. याबाबत डेक्कन हेराल्डने वृत्त दिले होते.
आमच्या पडताळणीत स्पष्ट झाले की, व्हायरल फोटो सचिन वाझेच्या फ्लॅटवरील कारवाई दरम्यान सापडेल्लाय घबाडाचे नसून देशात वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या धाडी दरम्यान मिळालेल्या पैशांचे व ज्वेलरीचे आहेत.
Read More : शेतकरी नेते राकेश टिकेत यांना राजस्थानात काळे फासण्यात आले आहे का?
Claim Review: सचिन वाझेच्या ठाण्यातील फ्लॅटमधून घबाड जप्त Claimed By: Social Media post Fact Check: Misleading |
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.