Thursday, March 28, 2024
Thursday, March 28, 2024

HomeFact CheckWeekly Wrap: राहुल गांधींचे कन्नड वर्तमानपत्र वाचन ते एमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्याने...

Weekly Wrap: राहुल गांधींचे कन्नड वर्तमानपत्र वाचन ते एमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

Authors

या सप्ताहात Newschecker.in ने सोशल मीडियात व्हायरल झालेला अनेक फेक न्यूजचा पर्दाफाश केला. राहुल गांधी यांचा कन्नड वर्तमानपत्र वाचत असल्याचा एक फोटो व्हायरल झाला या शिवाय गाझियाबादमधील मंदिरात पाणी पिण्यासाठी गेलेल्या मुलाला मारहाण झाली त्याच्या जखमांचे फोटो देखील सोशल मीडियात शेअर होत आहेत. एमपीएससीची 14 मार्च परीक्षा रद्द झाल्याने एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचा दावा देखील दावा व्हायरल होत आहे.

याशिवाय इतर काही दावे WhatsApp आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर व्हायरल होत आहेत. कदाचित आपणास देखील हे दावे पहायला मिळाले असतील. आपण इथे या सप्ताहातील टाॅप फेक न्यूज वाचू शकता.

राहुल गांधी कन्नड नाही तर इंग्रजी वर्तमानपत्र वाचत होते, व्हायरल झाला चुकीचा दावा

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात राहुल गांधी हे कन्नड भाषेतील वृत्तपत्र वाचत असल्याचे दिसत आहे. व्हायरल पोस्टममध्ये या पोस्टविषयी अनेक कमेंट्स देखील करण्यात आल्या आहेत. ज्याला हिंदीही व्यवस्थित येत नाही, तो कन्नड वर्तमानपत्र वाचत आहे असा दावा करण्यात आला आहे. पण हे सत्य नाही. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुशात सिंग राजपुतची हत्या झाल्याचा खुलासा केलेला नाही, हे आहे सत्य

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुशांत सिंगची हत्या झाली होती असा धक्कादायक खुलासा विधानपरिषदेत केला असल्याचा दावा एका सोशल मीडिया पोस्टमध्ये करण्यात आला आहे. या पोस्टमध्ये म्हटले आहे की, सुशांतसिंग राजपुतच्या मृत्यू प्रकरणात एक नवीन ट्विस्ट आला आहे. पण हे सत्य नाही. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

व्हायरल फोटो गाझियाबाद मधील मुलाचा नाही, हे आहे सत्य

मंदिरात पाणी पिण्यासाठी आलेल्या मुस्लीम धर्मीय मुलाला मारहाण केल्याची घटना उत्तर प्रदेशातील गाझियाबाद मधून उघडकीस आली आहे.तसेच या मुलाला मारहाणीमुळे झालेल्या जखमांचे फोटो देखील सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. पण हे व्हायरल फोटो गाझियाबादमधील मुलाचा नाही तर येमेनमधील मुलाचा आहे. पित्याने आपल्या मुलाला अमानुष मारहाण केली होती.हा फोटो गाझियाबाद घटनेच्या नावाने व्हायरल झाला. संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

MPSC परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना मागील वर्षीची, आताची म्हणून होतेय व्हायरल

MPSC परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्याने एका विद्यार्थ्याने रत्नागिरीत आत्महत्या केल्याची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. यात म्हटले आहे की, MPSC परीक्षा पुढे ढकलल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील महेश झोरे या युवकाने आत्महत्या केली आहे. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular