Saturday, December 10, 2022
Saturday, December 10, 2022

घरMarathiअहमदाबादमध्ये ट्रम्प यांच्या स्वागतासाठी रंगवलेल्या भिंतीवर विचित्र संदेश लिहिले आहेत का?

अहमदाबादमध्ये ट्रम्प यांच्या स्वागतासाठी रंगवलेल्या भिंतीवर विचित्र संदेश लिहिले आहेत का?

Claim– अहमदाबादमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना झोपड्या दिसून नयेत यासाठी भिंत बांधून त्यावर वेगवेगळे संदेश लिहून वास्तव लपविण्याचा प्रयत्न केला आहे.
Verification
ट्विटरवर सलमान निजामी नावाच्या यूजरने आपल्या ट्विटमध्ये दोन फोटो शेअर केले असून पहिल्या फोटोत भिंत रंगवण्याचे काम सुरु असून त्यावर पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे चित्र रेखाटले असून भिंतीवर पेशाब करना मना। यहां न थूके , सेक्स के रोगी मिले अशी वाक्य लिहिल्याचे स्पष्ट दिसत आहे. तर दुस-या फोटोत एका नाल्याजवळील झोपडपट्टी दिसत आहे.
आम्ही याबाबत पडताळणी सुरु केली असता आम्हाला हिंदुस्तान टाईम्सची बातमी आढळून आली. यात हा फोटो शेयर करण्यात आला आहे पण यात कुठेही भिंतीवर पेशाब करना मना। यहां न थूके , सेक्स के रोगी मिले अशी वाक्ये लिहिल्याचे आढळून आले नाही.
याशिवाय डेली मेल या इंग्रजी दैनिकाच्या वेबसाईटवर देखील ट्रम्प यांच्या स्वागतासाठीच्या तयारीची बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात देखील हा फोटो शेअर करण्यात आला आहे मात्र यात कुठेही विक्षिप्त सूचना लिहिल्याचे आढळून आले नाही.
यावरुन हेच लक्षात आले की हा फोटो एडिट करुव ट्विटमध्ये वापरण्यात आला आहे. यानंतर आम्ही ट्विटमध्ये शेअर करण्यात आलेल्या दुस-या फोटोचो शोध घेण्याचे ठरविले, काही कीवर्डसच्या आधारे शोध सुरु केला असता एबीपी न्यूजच्या बातमीचा एक व्हिडिओ आढळून आला. यात बातमीत सरन्यावास येथील स्थानिक लोकांनी ट्रम्प यांना झोपडपट्टी दिसू नये यासाठी भिंत बांधली जात असल्याचा आरोप केला आहे. आम्हाला व्हिडिओत
बातमीत दाखवण्यात आलेली झोपडपट्टी आणि ट्विटमध्ये शेयर करण्यात आलेला झोपडपट्टीचा फोटो हा वेगवेगळा असल्याने आम्ही व्हायरल फोटोचा शोध घेण्याचे ठरविले. गूगल रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने हा फोटो शोधला असता याचे अनेक परिणाम दिसून आले. हा फोटो मागील काही वर्षापासून इंटरनेट वर असल्याचे आढळून आले.
याशिवाय हा फोटो काही वर्षापूर्वी फ्री प्रेस या इंग्रजी दैनिकाच्या वेबसाईटवरील बातमीत प्रकाशित झाला होता
या बातमीत हा फोटो मुंबईतील धारावी झोपडपट्टीचा असल्याचे म्हटले आहे. याशिवाय आम्हाला 2012मध्ये प्रकाशित झालेल्या इंडियावायर्स या वेबसाईटवरील बातमीचे अर्काईव्ह व्हर्जन सापडले ज्यात हा फोटो शेअर कऱण्यात आला होता. यात बातमीत म्हटले आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत झोपडपट्टीच्या होणा-ाया वाढीसाठी सत्ताधा-यांवर निशाना साधला आहे.
यावरुन हेच सिद्ध होते की अहमदाबादमध्ये डोनाल्ड यांच्या आगमनानिमित्त बांधलेल्या भिंतीवर विचित्र संदेश लिहिलेले नाहीत शिवाय ट्विटमध्ये झोपडपट्टीचा जो फोटो शेअर करण्यात आहे ती अहमदाबादमधील नाही तर मुंबईतील धारावी झोपडपट्टी आहे. सोशल मीडियात एडिटेड व जुने फोटो शेअर करुन भ्रामक संदेश व्हायरल केला जात आहे.
Sources
Google Search
Twitter Advanced Search
Result- False 
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला [email protected] वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)
Yash Kshirsagar
Yash Kshirsagar
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.
Yash Kshirsagar
Yash Kshirsagar
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular