गृहमंत्रालयाने लोकांना ‘दिवाळीत मेड इन चायना वस्तू खरेदी करणे थांबवा’ असे सांगितले असल्याचा संदेश सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. यात म्हटले आहे की, लोकांनी चीनमध्ये बनवलेल्या वस्तू घेऊ नये. पाकिस्तान सरकार चीनच्या मदतीने भारतावर हल्ला करू शकते.असाही दावा करण्यात आला आहे की, हा संदेश गृह मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रसारित केला आहे. आपण खालील संदेश पाहू शकता.
गुप्तचरानुसार, पाकिस्तान भारतावर थेट हल्ला करू शकत नसल्याने त्याने भारताकडून बदला घेण्याची मागणी चीनकडे केली आहे. भारतात दमा पसरवण्यासाठी चीनने विशेष प्रकारचे फटाके भरले आहेत, जे कार्बन मोनोऑक्साईड वायूला विषारी आहेत. याशिवाय, भारतात, डोळ्यांच्या आजारांच्या विकासासाठी विशेष प्रकाश सजावटीचे दिवे देखील तयार केले जात आहेत. पारो मोठ्या प्रमाणात वापरला गेला आहे, कृपया या दिवाळीत जागरूक रहा आणि या चायनीज उत्पादनांचा वापर करू नका. हा संदेश सर्व भारतीयांपर्यंत पोहोचवा. जय हिंद
विश्वजित मुखर्जी, वरिष्ठ तपास अधिकारी, गृह मंत्रालय, भारत सरकार,
हा दावा फेसबुकवर देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल दावा खरा आहे का हे जाणून घेण्यासाठी आम्ही गृहमंत्रालयाच्या वेबसाईटला भेट दिली मात्र आम्हाला तिथे अशी कोणतीही माहिती आढळून आली नाही.
यानंतर आम्ही यानंतर आम्ही विश्वजित मुखर्जी नावाचा अधिकारी खरोखर गृह मंत्रालयात करत आहे की नाही हे देखील शोधले पण असा कोणी अधिकारी तेथे काम करत नसल्याचे आढळून आले.

व्हायरल दाव्याविषयी गृह मंत्रालयाने देखील याबाबत प्रेस नोट जारी करुन माहिती दिलेली नाही.त्यांनी जारी केलेल्या आवश्यक माहितीची यादी अनेकदा गृह मंत्रालय त्यांच्या वेबसाइटवर जारी करते.
याबाबत अधिक शोध घेतला असता आम्हाला पीआयबीचे एक ट्विट आढळून आले ज्यात गृहमंत्रालयाच्या नावाने व्हायरल होत असलेा संदेश खोटा असल्याचे म्हटले आहे. यात म्हटले आहे की चीन डोळे आणि फुफ्फुसांचे आजार निर्माण करणारे फटाके भारताला पाठवित आहे.
Conclusion
आमच्या पडताळणीत स्पष्ट झाले की, गृहमंत्रालयाच्या नावाने खोटा दावा व्हायरल होत आहे.
Result: Misleading
Our Sources
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला [email protected] वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा