Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

HomeFact Checkअहमदाबादमध्ये फळविक्रेत्यांच्या हातगाड्या जेसीबी मशीनने मोडण्यात आल्या नाहीत, व्हायरल झाला खोटा दावा

अहमदाबादमध्ये फळविक्रेत्यांच्या हातगाड्या जेसीबी मशीनने मोडण्यात आल्या नाहीत, व्हायरल झाला खोटा दावा

Claim

डोनाल्ड ट्रंपच्या स्वागतासाठी अहमदाबादमध्ये तयारी सुरु आहे. रस्त्यावरील गरीब फळविक्रेत्यांच्या हातगाडया जेसीबी मशीनने मोडून काढल्या.

Verification
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात जेसीबी मशीनच्या साहाय्याने फळविक्रेत्यांच्या हातगाड्या मोडून काढण्यात येत असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओसंदंर्भा दावा करण्यात येत आहे की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भारत दौ-यावर येणार असून गुजरातमध्ये एका कार्यक्रमात भाग घेणार आहेत. याची पूर्वतयारी म्हणून अहमदाबाद मध्ये अतिक्रमणे हटवणे सुरु आहे. यात गरीब फळविक्रेत्यांच्या हातगाड्या जेसीबी मशीनने तोडण्यात येत आहे. गरीबांना या देशात राहण्याचा अधिकार नाही का ? काय हा गुजरात माॅडेलचा भाग आहे ? असा प्रश्न देखील पोस्टमधून विचारला जात आहे.
आम्ही याबाबत पडताळणी सुरु केली असता आम्हाला जनसत्ता या वेबसाईटवर डोनाल्ड ट्रंप यांच्या स्वागतासाठी अहमदाबादमध्ये काय तयारी सुरु आहे याची बातमी आढळून आली. यात म्हटले आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांचा रोड शो ज्या मार्गावर असणार आहे तिथे एके ठिकाणी 500 झोपड्या आहेत त्या दिसून नयेत म्हणून रस्त्यालगत 6 फूट उंच आणि 600 मीटर लांब भिंत बांधण्याचे काम सुरु आहे. मात्र बातमीत कुठेही फळविक्रेत्यांच्या गाड्या जेसीबी मशीनने मोडल्याचा उल्लेख नाही.
त्यामुळे आमची व्हायरल व्हिडिओबद्दलची उत्सुकता वाढली आणि याबाबत शोध सुरुच ठेवला. व्हिडिओमधील काही स्क्रीनशाॅटस् काढले आणि Invid आणि Yandex च्या साहाय्याने काही कीवर्डसच्या साहाय्याने शोध सुरुच केला असता मागील महिन्यात हा ओडिशा टिव्हीच्या बातमीचा व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड कऱण्यात आल्याचे आढळून आले. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये म्हटले आहे की,  ओडिशातील भुवनेश्वरमधील मार्केट यूनिट-1 जवळ अतिक्रमण विरोधी कारवाईत फळगाड्या मोडून काढण्यात आल्या.
आम्ही व्हायरल व्हिडिओ आणि ओडिशा टिव्हीच्या व्हिडिओची तुलना केली.
 जेसीबी मशीन एकाच कंपनीची असल्याचे दिसून आले.
याशिवाय दोन्ही व्हिडिओमध्ये एकच टेम्पो असल्याचे आढळून आले.
यावरुन हेच स्पष्ट होते की हा व्हिडिओ गुजरातमधील नसून मागील महिन्यात ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये करण्यात आलेल्या अतिक्रमणविरोधी कारवाईचा आहे.  हा व्हिडिओ उत्तर प्रदेशच्या नावाने देखील व्हायरल झाला होता.
Sources
Twitter Advanced Search
Facebook Search
Google Search
Yandex
Result- Misleading
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)

Most Popular