Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

HomeFact Checkसोलापूर विमानतळ परिसरात फटाके फोडल्यामुळे लागलेल्या आगीचा हा व्हिडिओ नाही, वाचा सत्य

सोलापूर विमानतळ परिसरात फटाके फोडल्यामुळे लागलेल्या आगीचा हा व्हिडिओ नाही, वाचा सत्य

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Claim

पंतप्रधान  नरेंद्र मोदींच्या आवाहनाला फटाके फोडून प्रतिसाद, विमानतळ परिसरात लागली भीषण आग

दाव्याचे संक्षिप्त विवरण- कोरोना विरुद्धच्या लढाईत लोकांनी रविवारी रात्री 9 वाजता  दिवे , मेणबत्ती, टॉर्च लावून  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनला प्रतिसाद दिला.काही अतिउत्साही लोकांनी फटाके देखील फोडले. याच आशयाची एक बातमी टिव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीवर दाखवण्यात आली. यात म्हटले आहे की, सोलापुरात काही अतिउत्साही लोकांनी फटाके फोडल्याने विमानतळ परिसरात मोठी आग लागली ही आग विझवताना अग्निशमन दलाला कसरत करावी लागली. या आगीचा व्हिडिओ देखील बातमीत दाखवण्यात आला आहे.
Verification
आम्ही याबाबतीत पडताळणी सुरु केली असता सोलापूर विमानतळ परिसरात खरच भीषण आग  लागली का या संदर्भात शोध सुरु केला. ही बातमी सोशल मीडियात देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे आढळून आले. फेसबुकवर अनेक यूजर्सनी बातमी शेअर केली आहे तसेच आग लागल्याच्या पोस्टमध्ये हा व्हिडिओ अपलोड केला आहे.
आम्ही शोध सुरुच ठेवला असता आणखी एक ट्विट आढळून आले. या ट्विटमध्ये 15 सेंकदांचा आगीचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
यात म्हटले आहे की, सोलापूर विमानतळ परिसरात पुन्हा दिवे लावण्याच्या वेळेस आग लागली, फटाके फोडल्याचे कारण सांगितले जात आहे मात्र कारण अद्याप अस्पष्ट. या टविटवरील काही कमेंट आम्ही वाचल्या असता हा व्हिडिओ जुना असल्याच्या दावा करणा-या काही कमेंट्स आढळून आल्या. यानंतर आम्ही काही किवर्ड्सच्या आधारे यूट्यूबमध्ये शोध घेतला असता आम्हाला एबीपी माझाच्या बातमीचा दोन महिन्यांपुर्वीचा व्हिडिओ आढळून आला.
यात म्हटले आहे की वाळलेल्या गवतामुळे सोलापूर विमानतळ परिसरात मोठी आग लागली होती. अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.
याशिवाय आम्हाला लोकसत्ताची बातमी आढळून आली. यात म्हटले आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी आवाहन केल्यानंतर आज देशवासीयांनी घराघरात दिवे पेटले होते. मात्र सोलापूरात काही अतिउत्साहींनी फटाके देखील फोडले. त्यामुळे सोलापूर विमानतळावर परिसरातील काही भागात आग लागल्याची घटना घडली आहे.  स्थानिक उत्साही मंडळींनी फटाके फोडताना ठिणग्या गवतावर पडल्यामुळे आग लागल्याचे विमानतळावरील एका सुरक्षा रक्षकाने सांगितले. त्यामुळे घटनेची माहिती मिळताच सोलापूर महापालिकेच्या अग्निशमन दलाचे पाच पाण्याचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. परंतु अद्यापही आग आटोक्यात आली नसल्याचे सांगण्यात येत आहे.
यानंतर आम्ही टिव्ही 9 ने च्या बातमीचा तसेच सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ आणि एबीपी माझाच्या बातमीच्या व्हिडिओची तुलना केली असता दोन्ही व्हिडिओत समानता दिसून आली.
1.व्हायरल व्हिडिओ आणि एबीपीच्या व्हिडिओमध्ये झाड आणि आगीचे एकसारखे दृश्य दिसत आहे.
2.  दुरवर पसरलेल्या आगीचे देखील दोन्ही व्हिडिओमध्ये एकसारखे दृश्य दिसत आहेत दोन्ही व्हिडिओमध्ये  अग्निशमन दलाची गाडी आग आणि फवारणी करणारा जवान यांची दृश्ये समान आहेत.
याशिवाय आम्हाला सोलापुर जिल्ह्याचे पालकमंत्री जितेंद्र आव्हाड यांचे यासंदर्भात ट्विट देखील आढळून आले. यात त्यांनी म्हटले आहे कि काळजी करण्याचे कारण नाही परिस्थती आटोक्यात आहे. जिल्हाधिका-यांशी बोलणे झाले आहे.
यावरुन हेच स्पष्ट होते की, सोलापूर विमानतळ परिसरात आग लागल्याचा व्हिडिओ जुना आहे.   टिव्ही 9 मराठी तसेच सोशल मीडियामध्ये हा व्हिडिओ चुकीच्या दाव्यानिशी व्हायरल झाला.
Source 
Twitter Advanced Search
Facebook Search
Google Keyword Search
YouTube
Result- Misleading
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Most Popular