Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

HomeMarathiWeekly Wrap: प्रियांका गांधींचे व्हायरल फोटो ते भारत सरकारकडून मोफत रिचार्ज, या...

Weekly Wrap: प्रियांका गांधींचे व्हायरल फोटो ते भारत सरकारकडून मोफत रिचार्ज, या आहेत सप्ताहातील टाॅप फेक न्यूज

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

सोशल मीडिया हे एक व्यासपीठ आहे, जिथे प्रत्येक छोट्या किंवा मोठ्या घटनेबाबत अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया दिसतात. या आठवड्यात देखील, युजर्सनी अनेक बातम्यांबाबत वेगवेगळे दावे शेअर केले, ज्यामध्ये अनेक दावे दिशाभूल करणारे किंवा खोटे होते. आमच्या टीमने अशा अनेक फेक दाव्यांची वस्तुस्थिती तपासली आहे.

भारत सरकार जिओ,आयडिया, एअरटेलच्या ग्राहकांना मोफत रिचार्ज देत आहे का?

व्हॉट्सअॅप लिंकसह एक संदेश व्हायरल होत आहे. असा दावा केला जात आहे की देशात रेकॉर्डब्रेक लसीकरणाच्या आनंदात भारत सरकार जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन- आयडियाच्या ग्राहकांना तीन महिन्यांसाठी मोफत रिचार्ज देत आहे. असा दावा करण्यात आला आहे की ही ऑफर केवळ 15 ऑक्टोबरपर्यंत वैध आहे. पण हा दावा खोटा असल्याचे आमच्या पडताळणीत आढळून आले आहे. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

तामिळनाडूमध्ये रुद्राक्षची माळ घातल्यामुळे ख्रिश्चन शिक्षकाने विद्यार्थ्याला अमानुषपणे मारहाण केली?

तामिळनाडूमध्ये शिक्षकाने विद्यार्थ्याला अमानुषपणे मारहाण केल्याच्या दाव्याने एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओ शेअर करताना दावा केला जात आहे की, या हिंदू विद्यार्थ्याला तामिळनाडूच्या सरकारी शाळेत रुद्राक्षाची माळ घालून आल्याने ख्रिश्चन शिक्षकाने विद्यार्थ्याला अमानुषपणे मारहाण केली. पण हा दावा चुकीचा आहे. फॅक्ट चेकिंग इथे वाचा

गृहमंत्रालयाने लोकांना ‘दिवाळीत मेड इन चायना वस्तू खरेदी करणे थांबवा’ असे सांगितले आहे का?

गृहमंत्रालयाने लोकांना ‘दिवाळीत मेड इन चायना वस्तू खरेदी करणे थांबवा’ असे सांगितले असल्याचा संदेश सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. यात म्हटले आहे की, लोकांनी चीनमध्ये बनवलेल्या वस्तू घेऊ नये. पाकिस्तान सरकार चीनच्या मदतीने भारतावर हल्ला करू शकते.

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar

Most Popular