विधानसभा निवडणूक अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपली आहे. यावेळची निवडणूक अनेक नरेटिव्हसवर गाजते आहे. याच क्रमाने शिवसेना (UBT) नेते आणि खासदार संजय राऊत यांच्याबद्दलचा दावा केला जात आहे. आमचे सर्व उमेदवार धर्माने नसले तरी मनाने कट्टर मुसलमान आहेत, असे संजय राऊत म्हणाले. असे हा दावा सांगतो.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये योगी आदित्यनाथ यांच्या वेशात एक व्यक्ती जेसीबीवर उभा आहे. योगी आदित्यनाथ यांनी बुलडोझरवर स्वार होऊन महाराष्ट्रात प्रचार केल्याचा दावा करत हा व्हिडिओ शेअर केला जात आहे.
२० नोव्हेंबरला होत असलेल्या विधानसभा निवडणुकीला जोडून असंख्य दावे व्हायरल झाले. महाविकास आघाडीचा उमेदवार मेमन खानच्या रॅलीचा व्हिडीओ, असा दावा करण्यात आला. सोसायटीमध्ये सार्वजनिक कुर्बानी नाही तर दिवाळीची लाइटिंग ही नको असा आदेश उद्धव ठाकरे यांनी दिलाय, असा दावा झाला. शिवसेना (UBT) नेते संजय राऊत म्हणाले की, त्यांच्या पक्षाचे सरकार दाऊद इब्राहिमला क्लीन चिट देईल. असा दावा करण्यात आला. महाराष्ट्र स्वाभिमान सभेत राहुल गांधींनी छत्रपती शिवरायांचा अपमान केला, असा दावा झाला. काँग्रेसला मतदानासाठी थेट दुबई वरून फतवा काढण्यात आलाय, असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.
अतिशय सुंदर पद्धतीने इमारतीतून श्रीराम घोष करीत महाराष्ट्रात प्रचाराला सुरुवात झाली असे सांगत एका इमारतीमधून श्रीराम जयघोष करणाऱ्या नागरिकांचा व्हिडीओ शेयर केला जात आहे.