आयपीएल मध्ये मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर रोहित शर्माचा फोटो बुर्ज खलिफावर झळकला असल्याचा फोटो व्हायरल झाला आहे. पोस्टमध्ये म्हटले आहे की, बुर्ज खलिफावर रोहित शर्मा, जगातील पहिला क्रिकेटर आणि तिसरा भारतीय ज्याचा फोटो बुर्ज खिलाफावर झळकला आहे. महात्मा गांधी आणि शाहरुख खाननंतर रोहित शर्माचा फोटो या जगातील सर्वात उंच इमारतीवर झळकला असल्याचा दावा या पोस्टमध्ये करण्यात आला आहे.


Fact Check/Verification
आम्ही खरंच रोहित शर्माचा फोटो बुर्ज खिलाफावर झळकला होता का याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने शोध शुरु केला असता emirates247 या वेबसाईटवर 2016 साली प्रकाशित झालेल्या लेखात निळ्या रंगातील बुर्ज खलिफाचा फोटो आढळून आला.

व्हायरल फोटो आणि ब्लाॅगमधील 2016 रोजी प्रकाशित झालेला फोटोची तुलना करुन पाहिली असता आम्हाला रोहित शर्माचा फोटो एडिट केला असल्याचे आढळून आले.

याशिवाय आम्ही बुर्ज खलिफाचे अधिकृत ट्विटर हँडल तपासले असता रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्सचे अभिनंदन करण्यासाठी टॉवरवर रोहितचा फोटो झळकवल्याचा कोणताही पुरावा मिळाला नाही. बुर्ज खलिफाच्या ट्विटनुसार, 11 नोव्हेंबर रोजी पोलंड आणि अंगोलाचा स्वातंत्र्यदिनानिमित्त बुर्ज खलिफावर या देशांच्या ध्वजांचे फोटो झळकवण्यात आले होते.
आम्ही रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्सच्या सोशल मीडिया हँडल्सची देखील तपासणी केली आणि बुर्ज खलिफाच्या अभिनंदनबद्दल कोणतीही पोस्ट नसल्याचे समजले. मुंबई इंडियन्सने एक ग्राफिक पोस्ट केले होते ज्यात संघाचे नाव बुर्ज खलिफावर लिहिले गेले आहे.
Conclusion
यावरुन सिद्ध होते की आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर दुबईच्या बुर्ज खलिफा या जगातील सर्वात उंच इमारतीवर क्रिकेटर रोहित शर्माचा फोटो झळकला नव्हता. चार वर्षापुर्वीचा फोटो एडिट करुन रोहित शर्माचा फोटो व्हायरल करण्यात आला आहे.
Result-False
Our Sources
अमिराती 247- https://www.emirates247.com/news/emirates/burj-khalifa-lights-up-in-blue-on-sunday-2016-04-04-1.626166
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा, अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.