Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Viral
व्हॉट्सअपवरील गुड मॉर्निंग इमेजेस डाऊनलोड केल्यास बँक डिटेल्स चोरी जात असल्याचा दावा करणारा एक मॅसेज सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. यात म्हटले आहे की, चायनीज हॅकर्स अशा शुभेच्छांच्या इमेजेसद्वारे ‘फिशिंग’ करून आपला मोबाईल हॅक करताहेत. या संबंधी माहिती देणारी बातमी ‘शांघाय चायना इंटरनॅशनल न्यूज’ने प्रकाशित केली आहे.
मॅसेजमध्ये काय म्हटले आहे?


आम्ही व्हायरल दाव्याविषयी पडताळणी करण्यास सुरुवात केली पण याविषयी अधिक माहिती आढळून आली नाही. शिवाय पोस्टमध्ये उल्लेख करण्यात आलेल्या शांघाय चायना इंटरनॅशनल न्यूज बद्दल शोध घेतला पण असा नावाचे वृत्तपत्राची किंवा वेबसाईटी बातमी आढळून आली नाही.तसेच यामध्ये ओल्गा निकोलावेना नामक वकिलाने सतर्कतेचा इशारा दिलाय असाही उल्लेख आहे. परंतु अशा नावाची कुणी व्यक्ती अस्तित्वात असल्याचे आढळून आले नाही.
ओल्गा निकोलावेना गम्बिनी नावाच्या एका महिला वकील माहिती मिळाली परंतु त्यांनी व्हॉट्सऍपच्या गुडमोर्निंग इमेजेस बद्दल वक्तव्य केल्याचे कुठे आढळले नाही. तसेच एका पोस्टमध्ये व्हाट्सअॅपच्या नव्या प्रायव्हसी पाॅलिसीचा आणि व्हायरल दाव्याचा संबंध जोडण्यात आलेला आहे. मात्र आम्ही याची पडताणली केली असता यांतील मुद्दे वेगवेगळे असल्याचे आढळून आले.

नव्या पॉलिसीज नुसार व्हाट्सअप ने आपली काही खाजगी माहिती फेसबुक इन्स्टाग्राम या समूहातीलच कंपन्यांना तसेच थर्ड पार्टी कंपन्यांना पुरवण्याचा हक्क घेतला आहे. यासंदर्भात आम्हाला बीबीसी मराठीचा एक व्हिडिओ आढळून आला. मात्र कंपनीच्या या धोरणांचा आणि व्हायरल दाव्याचा संबंध नाही.
गुड माॅर्निंग इमेजेस डाऊनलोड संदर्भात Indian Computer Emergency Response Team ने देखील माहिती दिलेली नाही. ही संस्था सायबर सुरेक्षेशी संबंधित काही धोका असल्यास जनहितार्थ सूचना देत असते. मात्र त्यांच्या ट्विटर अकाउंटवर देखील अशी माहिती आढळून आली नाही.
यावरुन हेच स्पष्ट होते की, गुड माॅर्निंग मॅसेज इमेजेस डाऊनलोड केल्याने बॅंक अकाउंट रिकामे होत असल्याचा दावा चुकीचा आहे. अशी घटना सध्या तरी आढळून आलेली नाही.
ICERT- https://twitter.com/IndianCERT
Indian Express- https://indianexpress.com/article/explained/explained-what-you-need-to-know-about-whatsapps-new-privacy-policy-7135730/
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.