सोशल मीडियात धबधब्याच्या विहंगम दृश्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा करण्यात येत आहे की हा मध्यप्रदेशातील भेडा घाट धबधब्याचा व्हिडिओ आहे.

Fact Check / Verification
आम्ही व्हायरल व्हिडिओतील धबधबा नेमका कुठला आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता फेसबुकवर आम्हाला हा धबधबा भेडाघाट येथील असल्याचा दावा करणा-या पोस्ट आढळून आल्या.
व्हायरल व्हिडिओतील दृश्य हे भेडा घाट धबधब्याचे खरंच आहे का पडताळणी करण्याचे ठरविले. यासाठी व्हिडिओमधून काही स्क्रिनशाॅट्स काढले आणि रिव्हर्स इमेजच्या सहाय्याने शोध घेतला. असता आम्हाला या धबधब्याशी मिळता जुळता असणा-या धबधब्याचा एक व्हिडिओ यूट्यूबवर आढळून आला. हा कर्नाटकातील जोग धबधबा असल्याचे यात म्हटले आहे.
आम्ही अधिक शोध घेतला असता आम्हाला 24 सेंकदांचा व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका यूट्यूब चॅनलरवर आढळून आला. यात देखील हा व्हिडिओ कर्नाटकमधील जोग धबधब्याचा असल्याचे म्हटले आहे. हा व्हिडिओ मागील वर्षी अपलोड करण्यात आलेला आहे.
अधिक शोध घेतला असता, मागील वर्षी लोकसत्ताच्या यूटयूब चॅनलवर हा जोग धबधब्याचा व्हिडिओ अपोलड करण्यात आल्याचे आढळून आले. यात म्हटले आहे की, इथे देखील महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगलीप्रमाणे कर्नाटकातही त्यावेळी मुसळधार पाऊस कोसळत होता.
यानंतर आम्ही भेडा घाट येथील धबधबा कसा आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता आम्हाला jabalpurtourism.in या वेबसाईटवर हा फोटो आणि व्हिडिओ आढळून आले. तो व्हायरल व्हिडिओतील धबधब्याशी मिळताजुळता नाही

Conclusion
यावरुन हेच स्पष्ट होते की, व्हायरल व्हिडिओ मध्यप्रदेशातील भेडा घाट येथील नसून कर्नाटकमधील जोग धबधब्याचा आहे. सोशल मीडियात हा व्हिडिओ चुकीच्या दाव्याने व्हायरल होत आहे.
Result: False
Our Sources
लोकसत्ता- https://www.youtube.com/watch?v=rOXqpkQe7a0
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.