ਵੀਰਵਾਰ, ਦਸੰਬਰ 19, 2024
ਵੀਰਵਾਰ, ਦਸੰਬਰ 19, 2024

सुधारणा धोरण

आम्ही समाजावर सकारात्मक परिणाम व्हावा या उद्देशाने सुरु करण्यात आलेली एक तथ्थ पडताळणी संस्था आहोत. आम्ही अशा दाव्यांची किंवा विधानांची पडताळणी करतो की ज्यांची पडताळणी केली गेली नाहीतर समाजावर विपरित परिणाम होण्याची शक्यता असते. आमच्या वेबसाईटवर प्रकाशित केलेल्या सर्व लेखांची दोन स्तरांमध्ये तपासणी होते. आधी आमचे फॅक्ट चेकर्स त्यांचे लेख गुणवत्ता तपासणीसाठी पाठवितात. त्यानंतर गुणवत्ता परीक्षकांकडून मंजूरी मिळाल्यानंतर लेख प्रकाशित केला जातो. 

प्रक्रिया

आमच्या एखाद्या लेखात काही चूक आढळल्यास किंवा काही भाग वगळण्यासारखा वाटत असेल किंवा दुरुस्तीबाबत स्पष्टीकरण हवे असल्यास आपण आम्हाला याबाबत कळवू शकता. आमच्या कामात सुधारणा करण्यास मदत करणा-या कोणत्याही इनपुटबद्दल आम्ही कृतज्ञ असू. आपण कोणत्याही लेखात तात्काळ सुधारणांसाठी योग्य संदर्भ साम्रगी किंवा सार्वजनिकरित्या उपलब्ध असलेल्या माहितीच्या योग्य दुव्यांसह आपले अभिप्राय, दुुरुस्ती, तक्रारी किंवा शंका आम्हाला checkthis@newschecker.in या ईमेल वर कळवू शकता. या द्वारे सर्व निवेदने दररोज तपासली जातात.

Newschecker मध्ये प्रत्येक प्रतिक्रिया आणि अभिप्राय कमीत कमी दोन लोकांकडून तपासले जातात.टिप्पण्या किवा अभिप्राय पाहण्याची जबाबदारी असणारे कर्मचारी तसेच आम्हाला काय करावे लागेल हे ठरवणारे वरिष्ठ कर्मचारी लेखात काही महत्वपूर्ण मुद्दे गहाळ झाले नाहीत ना याची खात्री करण्यासाठी सर्व टिप्पण्या आणि अभिप्रायांचा आढावा घेतात. आम्ही आपला अभिप्राय किंवा टिप्पणी विचारात घेतल्यानंतर त्यास प्रतिसाद म्हणून आमच्या लेखात बदल करत असल्यास याबाबत आपणास कळविण्याचा प्रयत्न करतो. लेखात बदल करण्याचा निर्णय घेतल्यास ते अधोरेखित केले जाईल. 

  • वास्तविक चुकांच्या बाबतीत रिपोर्टमध्ये एक टिपण जोडले जाईल आणि त्यामध्ये बदल करण्यात आला आहे या स्पष्टीकरणासह “सुधारणा” ( CORRECTION) असे लेबल लावले जाईल.
  • स्पष्टीकरण किंवा अद्यतनांच्या बाबतीतही एक टिपण जोडले जाईल आणि त्यामध्ये बदल करण्यात आला आहे या स्पष्टीकरणासह “अद्यतन” (UPDATE) असे लेबल लावले जाईल.

अंतिमत: जर आपण एखाद्या रिपोर्टबद्दल तक्रार केली पण आमच्या प्रतिसादावर समाधानी नसाल तर आम्ही अंतर्गत आढावा घेऊ. आवश्यकता भासल्यास आमचे सल्लागार बोर्ड आपल्या तक्रारीचे पुनरावलोकन करण्यासाठी स्वतंत्र व्यक्तीची नेमणूक करू शकते.