1. स्टोरीची निवड
आम्ही संशयास्पद पोस्ट, चुकीची माहिती किंवा बनावट दाव्यांसंदर्भात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे सतत अनुसरण करतो. आमची निवड प्रक्रिया विविध घटकांवर आधारित आहे, यामध्ये अहवालात दावा केलेल्या पुराव्यांची संख्या किंवा टप्पे, सार्वजनिक चर्चा करताना लेखाची संभाव्य प्रासंगिकता आणि स्त्रोतांचा आवाका यांचा समावेश आहे. आमच्या स्त्रोतांमध्ये राजकारणी, ख्यातनाम व्यक्ती, प्रसिद्ध आणि प्रभावशाली व्यक्तिमत्वांनी केलेले दावे किंवा त्याविषयी व्यक्त केलेली मते याशिवाय अपप्रचार, चिथावणी देणारे संदेश किंवा हॅशटॅग यांचा समावेश आहे.
2. तपास
आम्ही विशिष्ट दृष्टीकोनाशिवाय विविध माध्यमांमधील लेख आणि दाव्यांचे पुनरावलोकन करतो. जिथे शक्य असेल तिथे मूळ विधानाची अचूकता पडताळण्यासाठी ज्याने दावा केला आहे त्या व्यक्ती / संस्थेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो. दावा करणा-याने दिलेल्या स्त्रोतांची चौकशी करतो. आम्ही व्हायरल व्हिडिओ किंवा प्रतिमेचे मूळ निश्चित करण्यासाठी गूगल रिव्हर्स इमेज सर्च, रिव्हआय, टिनआय, बिंग, एक्सिफ इत्यादी इंटरनेट साधनांचा वापर करतो. तथ्य पडताळणी केवळ दाव्या करण्यापुरती मर्यादित नाही तर काळानुसार आणि ट्रेंड नुसार या एेतिहासिक डेटाकडे पाहता येते.
3. गुणवत्ता तपासणी
Ourआमचे गुणवत्ता परीक्षक तपासलेल्या लेखांमध्ये सर्व टप्प्यांचे अनुसरण केल आहे की नाही याचा आढावा घेतात. एकदा गुणवत्ता तपासणी झाली की तो लेख आमच्या वेबसाईटवर प्रकाशित केला जातो.
4. प्रकाशन /निर्णय
सत्यापित लेख आमच्या वेबसाईटवर प्रकाशित केला जातो, यात फॅक्ट चेकिंग करताना केलेली कार्यवाही आणि निष्कर्षाचे वर्णन असते.
5. सुधारणा
कोणत्याही सुधारणा किंवा दुुरस्तीसाठी वाचकांना टिप्पणी करण्यास किंवा याबाबत लिहिण्यास आमच्याकडून प्रोत्साहित केले जाते. अशा सगळ्या संप्रेषणांना अत्यंत गांभीर्याने घेतले जाते आणि ते वैध्य असल्याचे आढळ्यास संबंधित सुधारणा केल्या जातात.