Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
AI/Deepfake
व्हिडिओमध्ये लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी “भगवा राजकारण” भारतीय सैन्याच्या मूल्यांना आणि मनोबलाला कमकुवत करत आहे, असा इशारा दिल्याचे दाखवले आहे.
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी असे कोणतेही विधान केलेले नाही. हा व्हिडिओ AI च्या मदतीने बनावटरीत्या तयार (manipulated) करण्यात आला आहे.
भारतीय सैन्याचे वरिष्ठ अधिकारी लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी सैन्यात “भगवा राजकारणाचा” प्रभाव वाढत असल्याची टीका करताना दिसत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.
व्हायरल क्लिपमध्ये लेफ्टनंट जनरल घई यांचा असा कथित आवाज ऐकू येतो, “या गणवेशाची अनेक दशकं सेवा केलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नात्याने मी चिंता व्यक्त करतो. वाढतं भगवा राजकारण भारतीय सैन्याच्या मूळ मूल्यांना कुरतडत आहे… जेव्हा विचारसरणी निष्ठेवर अधिराज्य गाजवू लागते, तेव्हा ती मनोबल फोडते, अंतर्गत अविश्वास पसरवते आणि युद्धकौशल्य कमजोर करते. जर ही प्रवृत्ती सुरूच राहिली, तर आपल्याला बाहेरील शत्रू नाही तर आपल्या स्वतःच्या रँकमधील राजकीय विष पराभूत करेल.”
हा व्हिडिओ सोशल मीडियावर खरा समजून मोठ्या प्रमाणावर शेअर करण्यात आला.

“Lt Gen Rajiv Ghai saffron politics” या कीवर्डसह केलेल्या शोधात या दाव्याला समर्थन देणारे एकही विश्वासार्ह वृत्त, रिपोर्ट किंवा अधिकृत विधान आढळले नाही.
व्हायरल क्लिपमधील काही दृश्यांचे रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर आम्हाला Republic World या न्यूज चॅनेलचा एक YouTube लाइव्ह व्हिडिओ सापडला, जो 18 ऑक्टोबर 2025 रोजी थेट प्रसारित झाला होता. या व्हिडिओमध्ये ले. जन. राजीव घई एका परिषदेत (conclave) बोलताना दिसतात. व्हायरल व्हिडिओमधील पार्श्वभूमी (backdrop) ह्या वैध प्रसारणाशी पूर्णतः जुळते, मात्र त्या मूळ भाषणात त्यांनी “भगवा राजकारण” असा कोणताही उल्लेख केलेला नाही.

Newschecker ने बारकाईने निरीक्षण केल्यावर व्हिडिओमध्ये दृश्य विकृती (visual distortions) स्पष्टपणे दिसतात. अधिकाऱ्याच्या गणवेशावरील चिन्ह (insignia) वाकलेले व अस्पष्ट दिसते, तर स्क्रीनवर दिसणारा “Defence” हा मजकूर वारंवार हलतो आणि glitch निर्माण होतो. याशिवाय, त्यांच्या ओठांच्या हालचालीही अप्राकृतिक आणि विसंगत दिसतात, जे AI-निर्मित माध्यमांच्या वैशिष्ट्यांशी जुळणारे आहेत.

Hive Moderation या विश्लेषण साधनाने व्हिडिओमध्ये 94.2% शक्यता AI-निर्मित घटक असल्याची नोंद केली.
Hiya Deepfake Voice Detector या साधनाने व्हिडिओमधील आवाज Deepfake असल्याची शक्यता दर्शवली.
तसेच Resemble.ai च्या तपासणीतही हे आवाज वास्तविक (authentic) नसल्याचे पुष्टी झाली.
भारत सरकारच्या PIB Fact Check हँडलने स्पष्ट केले की हा व्हिडिओ खोटा असून कृत्रिम बुद्धिमत्तेने (AI) तयार केलेला आहे. त्यांनी अधिकृतरित्या पुष्टी केली की, “लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी असे कोणतेही विधान केलेले नाही.”
भारतीय सैन्यात “भगवा राजकारणाचा प्रभाव वाढत आहे” असा इशारा लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी दिल्याचा दावा AI च्या मदतीने फेरफार (manipulate) केलेल्या बनावट व्हिडिओवर आधारित आहे. त्या अधिकाऱ्यांनी असा कोणताही इशारा किंवा विधान दिलेले नाही.
Sources
YouTube Video By Republic World, Dated October 18, 2025
X Post By PIB Fact Check, Dated October 23, 2025
Hive Moderation Website
Resemble.ai Website
Hiya Deepfake Voice Detector
JP Tripathi
November 24, 2025
Vasudha Beri
November 14, 2025
Vasudha Beri
November 12, 2025