Authors
Claim
MVA नेत्या सुप्रिया सुळे, नेते नाना पटोले आणि पुण्याचे माजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या 2018 च्या क्रिप्टोकरन्सी फसवणूक प्रकरणाशी संबंधित बिटकॉइन्सबद्दलच्या ऑडिओ नोट्स.
Fact
डिटेक्शन टूल्सनी सुळे, गुप्ता यांच्या कथित ऑडिओ नोट्स AI जनरेटेड असल्याच्या उच्च संभाव्यतेचा निष्कर्ष काढला, तर पटोले यांचा ऑडिओ अनिर्णित राहिला.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या एक दिवस आधी, पुण्यातील माजी-आयपीएस अधिकारी, रवींद्रनाथ पाटील यांनी 2018 च्या क्रिप्टोकरन्सी फसवणूक प्रकरणात NCP-SP नेत्या सुप्रिया सुळे आणि महाराष्ट्र काँग्रेसचे प्रमुख नाना पटोले यांच्यावर आरोप करून राजकीय वादळ निर्माण केले. अवघा महाराष्ट्र ‘बिटकॉइन एक्सपोज’ वरून राजकीय वादाचा साक्षीदार बनला.
पाटील यांनी आरोप केला की, पुण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि सायबर गुन्ह्यांच्या तपासातील तत्कालीन डीसीपी भाग्यश्री नौटके हे बिटकॉइन्सच्या गैरव्यवहारात सामील होते, ज्याचा वापर अखेरीस दोन राजकारण्यांनी केला. बिटकॉइन्सचा वापर निवडणुकीशी निगडीत कामांमध्ये होत असल्याचा दावा त्यांनी केला.
सुळे, पटोले, गुप्ता आणि एक ‘गौरव मेहता’ जो एका ऑडिट फर्मचा कथित कर्मचारी आहे, यांच्या अनेक कथित ऑडिओ नोट्स, तेव्हापासूनच युजर्सनी राजकारण्यांना “उघड” करण्याचा दावा करत ऑनलाइन व्हायरल केल्या आहेत. भाजपनेही आरोपांवरून MVA वर हल्ला चढवला आणि त्याच कथित ऑडिओ नोट्स सादर केल्या.
अशा पोस्ट इथे आणि इथे पाहता येतील.
Fact Check/ Verification
आम्ही ऑडिओ नोट्स एक-एक करून तपासल्या.
ऑडिओ 1: दावा, ‘सुप्रिया सुळे निवडणुकीसाठी बिटकॉइन्स एन्कॅश करण्यास सांगतात’
सुळे यांनी मेहता यांना बिटकॉइन्स एन्कॅश करण्यास सांगितले असा दावा करणाऱ्या व्हायरल ऑडिओची एकापेक्षा जास्त डिटेक्शन टूल्सने AI व्युत्पन्न सामग्री म्हणून उच्च संभाव्यता दर्शविली आहे. यासंदर्भातील आमचे फॅक्टचेक येथे, येथे आणि येथे वाचता येतील.
ऑडिओ 2: दावा, ‘गौरव मेहता अमिताभ गुप्ता यांच्याशी बोलतो’
The Deepfakes Analysis Unit (DAU), The Misinformation Combat Alliance (MCA), ज्याचा Newschecker एक भाग आहे, ने व्हायरल ऑडिओची सत्यता पडताळून पाहण्यासाठी अनेक डिटेक्शन टूल्स वर तो चालविला.
Hiya AI व्हॉइस डिटेक्शन टूलने सांगितले की “आवाज AI व्युत्पन्न झालेला दिसतो.” तसेच, ”लाइव्ह मानवी मार्करशी 14% जुडलेला आहे.”
DAU ने True Media वर ऑडिओ तपासला ज्याने “फेरफारचे ठोस पुरावे” दाखवले. Hive च्या ऑडिओ डिटेक्टरने ऑडिओ ट्रॅकमध्ये AI छेडछाड केल्याचा ठोस पुरावा देखील दर्शविला.
ऑडिओ 3: दावा, ‘अमिताभ गुप्ता गौरव मेहता यांना निर्देश देतात’
व्हायरल क्लिपचे काळजीपूर्वक विश्लेषण केल्यावर, आम्हाला “लक्ष्मी” आणि “भाग्यश्री” या भारतीय नावांचे उच्चार विषम आढळले.
डीपफेक्स ॲनालिसिस युनिट (डीएयू) ने अनेक एआय डिटेक्शन प्लॅटफॉर्मवर व्हायरल ऑडिओ देखील तपासले. Hiya AI व्हॉईस डिटेक्शन टूलला “AI व्युत्पन्न” वाटणारा आवाज आढळला आणि “लाइव्ह मानवी मार्करशी 4% जुळणी आहे” असा निष्कर्ष काढला.
दुसरे डिटेक्शन टूल, ट्रू मीडियाने व्हायरल ऑडिओ नोटमध्ये “फेरफारचे ठोस पुरावे” देखील सूचित केले आहेत. Hive च्या ऑडिओ डिटेक्टरने देखील AI घटकांच्या उपस्थितीचा निष्कर्ष काढला.
ऑडिओ 4: दावा, ‘नाना पटोले अमिताभ गुप्ता यांच्याकडून पैशांची मागणी करतात’
आम्ही अनेक AI शोध साधनांवर ऑडिओ नोट टाकली, तथापि, निर्णायक परिणाम आढळला नाही. ऑडिओ क्लिप अत्यंत लहान आहे आणि टूल्स त्यामधील फेरफाराचे कोणतेही चिन्ह शोधण्यात सक्षम नसण्याचे कारण असू शकते.
दरम्यान पटोले यांनी आरोपांचे खंडन केले असून, व्हायरल क्लिपमध्ये आपला आवाज ऐकू येत नसल्याचे स्पष्ट केले आहे. भाजपने आणलेले आयपीएस अधिकारी रवींद्र पाटील हे आयपीएस अधिकारीही नाहीत. भाजप हा लबाडांचा पक्ष झाला आहे. निवडणुकीच्या पूर्वसंध्येला ते हे सर्व करत आहेत. माझा आवाज ऑडिओमध्ये नाही. मी शेती करणारा माणूस आहे; मला बिटकॉइन देखील समजत नाही,” असे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रमुख म्हणाले.
Conclusion
कथित नाना पटोले यांची ऑडिओ नोट अनिर्णित राहिली असली तरी, अनेक साधनांनी असा निष्कर्ष काढला की इतर तीन व्हॉईस क्लिप AI व्युत्पन्न असण्याची उच्च शक्यता आहे.
Result: Altered Photo/Video
Sources
Hiya AI Voice Detection Tool
True Media Website
Hive Tool
(हे आर्टिकल सर्वप्रथम न्यूजचेकर इंग्रजीसाठी वसुधा बेरी यांनी केले असून ते इथे वाचता येईल.)
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा