Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
AI/Deepfake
इकबालने आपली बहीण जोयाशी लग्न केले असे दाखवणारा व्हायरल कोलाजच्या माध्यमातून दावा.
या दाव्याला कोणताच आधार नसून कोलाजमधील तीन फोटो इंटनेटवर जुने आहेत आणि एक फोटो AI जनरेटेड आहे.
सध्या एक फोटो कोलाज चांगलाच व्हायरल झाला आहे. यामाध्यमातून इकबालने आपल्या बहिणीशी लग्न केले असा दावा केला जात आहे.

दाव्याचे संग्रहण येथे पाहता येईल.
“इकबालने आपल्या बहिणी जोयाशी लग्न केले आणि लगेचच तो बाबा होणार होता. त्यामुळे इकबालला आपल्या बहिणीवर म्हणजेच बायकोवर संशय आला आणि त्याने तिच्यावर लक्ष ठेवायला सुरुवात केली. त्यानंतर त्याला कळले की त्याच्या बहिणीचा एक प्रियकर आहे ज्याचे नाव फिरोज आहे आणि तोसुद्धा त्याच परिसरात राहतो. हे कळल्यावर इकबालला आपल्या बहिणीशी लग्न केल्याचे खूप वाईट वाटले. आणि त्याहूनही मोठा धक्का त्याला बसला की तो बाबा होणार नाही तर त्या मुलाचा मामा होणार आहे.” अशा कॅप्शनसह हा दावा केला जात आहे.
न्यूजचेकरच्या तपासात हा दावा संबंध नसलेल्या फोटोंच्या साहाय्याने दिशाभूल करीत असल्याचे दिसून आले.
सर्वप्रथम व्हायरल दाव्यातील मजकूर आम्ही किवर्डसच्या माध्यमातून शोधून पाहिला. मात्र इकबाल नामक मुस्लिम व्यक्तीने आपल्या जोया नामक बहिणीशी लग्न केल्याची माहिती देणारी कोणतीच बातमी किंवा रिपोर्ट उपलब्ध झाले नाहीत.
यामुळे आम्ही व्हायरल कोलाजमधील छायाचित्रांच्या आधाराने या दाव्याच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला.

या दाव्यात वापरलेल्या कोलाज मधील पहिल्या छायाचित्रावर आम्ही रिव्हर्स इमेज सर्च केला. आम्हाला हेच छायाचित्र वापरून प्रकाशित करण्यात आलेले दोन न्यूज रिपोर्ट मिळाले. दैनिक भास्करने दोन वर्षांपूर्वी प्रसिद्ध केलेल्या एका बातमीत तसेच India.com ने १० जून २०२३ रोजी प्रसिद्ध केलेल्या फोटो रिपोर्टमध्ये आम्हाला हा फोटो आणि वेबसिरीज मध्ये काम करून चर्चेत आलेली नायिका गहना वशिष्ठ ने आपला मुस्लिम बॉयफ्रेंड फैजान अन्सारी याच्याशी विवाह केल्याचे वाचायला मिळाले.


आम्ही छायाचित्रात असलेली महिला नायिका गहना वशिष्ठ आहे का? याच्या पडताळणीसाठी तिचे सोशल मीडिया अकाउंट्स पाहिले. दरम्यान तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरील तिची छायाचित्रे आणि व्हायरल फोटोतील छायाचित्रावरून ती नायिका गहना वशिष्ठच असल्याचे स्पष्ट होते.


यादरम्यान नायिका गहना हिने मुस्लिम व्यक्तीशी लग्न केलेले असले तरी ती मुस्लिम नसल्याने आणि तिचे नाव जोया नसल्याने व्हायरल कोलाजमध्ये हे छायाचित्र वापरून केलेला दावा खोटा असल्याचे दिसून आले.

कोलाजमधील दुसऱ्या छायाचित्रावरही आम्ही रिव्हर्स इमेज सर्च केला असता आम्हाला हे छायाचित्र wonderful_hijabs नामक इंस्टाग्राम खात्यावर ४ ऑगस्ट २०२० पासून उपलब्ध असल्याचे दिसून आले.

संबंधित अकाउंट चालक हिजाब ब्लॉगर असून अशाप्रकारची हिजाब घातलेल्या महिला व त्यांच्यासोबत असलेल्या पुरुषांची असंख्य छायाचित्रे आम्हाला तेथे आढळली.

यावरून इंटरनेटवर उपलब्ध फोटोचा वापर कोलाजमध्ये करण्यात आला असल्याचे दिसून आले.


अशाप्रकारे रिव्हर्स इमेज सर्चवरून आम्हाला छायाचित्र क्रमांक ३ हे सुद्धा Vistacreate या स्टॉक इमेजच्या वेबसाईटवर उपलब्ध असल्याचे दिसून आले.

छायाचित्र क्रमांक ४ चा मूळ स्रोत मात्र आम्हाला उपलब्ध झाला नाही. दरम्यान विविध AI डिटेक्शन टूल्सवर आम्ही ते तपासले. यापैकी Hive Moderation ने हे छायाचित्र AI तंत्राचा वापर करून बनविण्यात आले असल्याची शक्यता ९९.८ टक्के असल्याची माहिती दिली आहे.

Was it ai ने ही हे छायाचित्र AI तंत्राचा वापर करून बनविण्यात आले असल्याचे स्पष्ट केले.

आणखी एक AI डिटेक्शन टूल AI or not ने ही हे छायाचित्र AI जनरेटेड असल्याच्या शक्यतेला दुजोरा दिला आहे.

अशाप्रकारे आमच्या तपासात तीन इंटरनेटवर उपलब्ध आणि एक AI जनरेटेड छायाचित्र वापरून इकबालने आपली बहीण जोयाशी विवाह केल्याचा खोटा दावा करण्यात आला असल्याचे स्पष्ट झाले.
Our Sources
Article published by Dainik Bhaskar
Report published by india.com on June 10, 2023
Photo shared by Instagram page wonderful_hijab on August 4, 2020
Vistacreate
Hive Moderation
Was it ai
ai or not
Prasad S Prabhu
July 24, 2025
Salman
July 23, 2025
Komal Singh
January 16, 2025