Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
AI/Deepfake
भारतीय लष्कर प्रमुख (COAS) जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी 2028 पर्यंत “गैर-हिंदू सैनिकांची संख्या अर्धी करण्याचे” धोरण जाहीर केले आहे.
हा दावा पूर्णपणे खोटा असून, व्हायरल व्हिडिओ AI आणि डीपफेक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बनवलेला आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. या व्हिडिओत असा दावा केला जातो की भारतीय लष्कर प्रमुख (COAS) जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी 2028 पर्यंत “गैर-हिंदू सैनिकांची संख्या अर्धी करण्याचे” धोरण जाहीर केले आहे.

“General Upendra Dwivedi”, “non-Hindu soldiers”, “Indian Army” अशा कीवर्ड्ससह केलेला गुगल शोध काहीही विश्वासार्ह वृत्त किंवा प्रेस रिलीज सापडला नाही. भारतीय सैन्याचे अधिकृत सोशल मीडिया पेजेस (येथे, येथे आणि येथे) मध्ये देखील असे विधान आढळलेले नाहीत.
व्हायरल क्लिपच्या कीफ्रेम्सचा रिव्हर्स इमेज सर्च केल्यानंतर १ नोव्हेंबर २०२५ रोजीची ANI ची एक पोस्ट आढळली, ज्यामध्ये अगदी हीच पार्श्वभूमी दिसते. त्या सत्यापित (verified) व्हिडिओमध्ये जनरल उपेंद्र द्विवेदी हे मध्य प्रदेशातील रेव्हा येथील टीआरएस कॉलेजच्या भेटीबाबत बोलताना दिसतात, धर्म किंवा लष्करी धोरणासंबंधी एकही उल्लेख त्यांनी केलेला नाही.
तसेच, भारतीय लष्कराच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरूनही जनरल द्विवेदी यांच्या सतना आणि रेव्हा येथील शैक्षणिक संस्थांना दिलेल्या भेटीबद्दलची माहिती शेअर करण्यात आली आहे.

व्हिडिओ फ्रेम-बाय-फ्रेम पाहिल्यावर आम्हाला खालील गोष्टी आढळल्या:

अनेक AI detection tools वर व्हिडीओ तपासला,

भारत सरकारच्या PIB Fact Check विभागाने या व्हिडिओला पूर्णपणे फेक आणि AI-जनरेटेड असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांच्या पोस्टनुसार, “भारतीय लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी अशा प्रकारचे कोणतेही विधान केलेले नाही. सोशल मीडियावर फिरणारा हा व्हिडिओ बनावट असून दिशाभूल करणारा आहे.”
व्हायरल व्हिडिओ, ज्यात जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी २०२८ पर्यंत ‘गैर-हिंदू’ सैनिकांची संख्या कमी करणार असल्याची घोषणा केली अशी टीका केली जाते, खोटी आणि AI-द्वारे संपादित केलेली आहे. आर्मी चीफने असे कोणतेही विधान केलेले नाही आणि त्या फुटेजमध्ये डिजिटलरीत्या फेरफार करण्यात आला आहे.
Sources
X Post By ANI, Dated November 1, 2025
X Post By PIB Fact Check, Dated November 4, 2025
Hive Moderation Website
Resemble.ai Website
Hiya Deepfake Voice Detector
Prasad S Prabhu
December 2, 2025
Salman
November 29, 2025
JP Tripathi
November 27, 2025