Claim
कारल्याचा रस पिल्याने शरीरातून दोन तासात कोरोनाचा वायरस नष्ट होतो.

दाव्याचे संक्षिप्त विवरण
सोशल मीडिया प्लॅटफाॅर्म शेअरचॅटवर कोरोना व्हायरसच्या उपायाबद्दल बिहार आरोग्य केंद्र पटनाच्या नावाने एक पोस्ट व्हायरल होत आहे. यात म्हटले आहे की, वैज्ञानिकांना कोरोना व्हायरचा उपचार शोधण्यात यश आले आहे. कारल्याचा रस पिल्यानंतर दोन तासात कोरोनाचा विषाणू नष्ट होतो.
Verification
सोशल मीडियामध्ये व्हायरल होत असलेल्या दाव्याचे आम्ही पडताळणी सुरु केली. याच दरम्यान आम्हाला हाच दावा असणा-या अनेक पोस्ट वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर आढळून आल्या
आम्ही शोध सुरुच ठेवला आणि गूगलमध्ये याबाबत काही माहिती मिळतेय का याची पडताळणी केली पण बिहार स्वास्थ्य केंद्राच्या नावाने कोरोना संदर्भातील कोणतीही बातमी आढळून आली नाही. याच दरम्यान आम्हाला पीआयबीचे एक ट्विट आढळून आले यात कारल्याचा रस पिल्याने कोरोना व्हायरस नष्ट होतो ही अफवा असल्याचे म्हटले आहे.
भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटूंबकल्याण विभागाच्या वेबसाईटवर देखील ही माहिती दिलेली नाही.
याशिवाय आम्ही जागतिक आरोग्य संघटनेची (WHO) वेबसाईट देखील तपासली पण तिथे देखील आम्हाला कारल्याचा रसाचा उपाय सांगितल्याचे आढळून आले नाही. संघटनेच्या माहितीनुसार कोरोना व्हायरसवर अजून तरी कोणतीही लस किंवा औषध उपलब्ध झालेले नाही. वैज्ञानिकांचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे आरोग्य संघटनेने कोणतेही औषध घेण्याची शिफारस केलेली नाही.
यावरुन हेच स्पष्ट होते की, कारल्याचा रसामुळे दोन तासात कोरोना व्हायरस नष्ट होतो ही सोशल मीडियात पसरलेली निव्वळ अफवा आहे. लोकांनी अशा अफवांवर विश्वास ठेऊ नये.
Source
- Facebook
- Sharechat
- Google
- Twitter
Result- False
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)