Claim–
इंडोनेशिया में खुले में जरूरत का समान रखा जाता है कोई भी किसी समय ले जा सकता हैं ये होती है सच्ची मानव सेवा हमारे यहां रोटी देते हैं दो और फोटो खिंचवाते है आठ
अनुवाद–
इंडोनेशियामध्ये गरजेचे सामान खुल्या मैदानात ठेवले जाते ते कोणीही कधीही घेऊन जाऊ शकते. हीच खऱी मानव सेवा आहे, मात्र आपल्याकडे भाकरी देतात दोन आणि फोटो काढतात आठ.
लाॅकडाऊन दरम्यान सोशल मीडियामध्ये एक फोटो व्हायरल होत आहे या फोटोमध्ये धान्याची पोती आणि आणखी काही अनेक पिशव्यांचे ढिगारे मोकळ्या जागेत ठेवल्याचे दिसत आहे. पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, हा फोटो इंडोनेशियातील असून तेथे अशा प्रकारे रोजचे गरजेचे सामान खुल्या मैदानात ठेवले जाते, ज्याला गरज आहे ती व्यक्ती हे सामान कधीही घेऊन जाऊ शकते मात्र आपल्याकडे दोन भाकरी देताना लोक आठ फोटो काढतात.
Verification-
व्हायरल फोटो संदर्भात आम्ही पडताळणी सुरु केली. याबाबत अधिक माहिती मिळवण्याकरिता काही किवर्डच्या आधारे गूगलमध्ये शोध घेतला असता आम्हाला फेसबुक वर याच दाव्याच्या अनेक पोस्ट आढळून आल्या.
आम्ही या संदर्भात गूगल रिव्हर्स इमेजचा आधारे शोध घेतला असता एक ट्विट आढळले ज्यात म्हटले आहे की रवांडामध्ये लाॅकडाऊनदरम्यान अशा प्रकारे गरजू लोकांसाठी दैनंदिन आवश्यक सामान ठेवले गेले आहे.
याबाबत शोध सुरुच ठेवला असता आम्हाला मागील वर्षीचा एक
ब्लाॅग आढळून आला ज्यात हा फोटो शेयर करण्यात आला आहे. यात म्हटले आहे की, अफ्रिकेचे 25 वर्षापासूनचे सल्लागार शेख इमाम यांनी आपल्या जगभरातील ग्राहकांच्या समस्या दूर करण्यासाठी व सल्ला देण्यासाठी आपले जीवन समर्पित केले आहे. शेख इमाम यांचे पिता इमाम बसाइको यांचा जन्म लोकांना मदत करण्यासाठी आणि समस्या सोडवण्यासाठी समर्पित झालेल्या अशा परिवारात झाला. शेख अहमद बंबा हे त्यांचे आजोबा तर शेख अब्दुलकादीर जिलानी हे त्यांचे पणजोबा होते. शेख इमाम इंग्रजी स्पॅनिश अरबी आणि फ्रेंच भाषेत निपुण आहेत. संपूर्ण अफ्रिकेत ते आपल्या चांगल्या कामासाठी आणि सल्ल्यासाठी प्रसिद्ध आहेत त्यांचा या कार्यासाठी सन्मान देखील करण्यात आला आहे. इमाम हे गॅम्बियामधील गरीब गरजू लोकांना तसेच शाळांना आणि अनाथ लोकांना अन्नदान करत आहेत.
यावरुन हेच स्पष्ट होते की, हा फोटो इंडोनेशिया किंवा रवांडा या देशात लाॅकडाऊन दरम्यान गरजूंसाठी ठेवलेल्या आवश्यक सामानाचा नाही तर अफ्रिकेतील इमाम यांनी गरीबांसाठी आणि गरजूंसाठी गेल्यावर्षी वाटप केलेल्या आवश्यक वस्तूंचा आहे. तोच फोटो आत्ता लाॅकडाऊनच्या काळात भ्रामक दाव्याने व्हायरल झाला आहे.
Source
Facebook Search
Google Search
Google Reverse Image
Twitter Advanced Search
Result– False Conext
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)