Claim–
बाॅलिवूड अभिनेता अक्षय कुमारने कोरोनाशी लढण्यासाठी महाराष्ट्र सरकारला 180 कोटींचा धनादेश दिला.

दाव्याचे संक्षिप्त विवरण-
अक्षय कुमार आणि राज्याचे युवा पर्यंटनमंत्री आदित्य ठाकरे यांचा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला असून या फोटोसोबत एक पोस्ट देखील व्हायरल झाली आहे. यात म्हटले आहे की, अक्षय कुमारने महाराष्ट्र सरकारला कोरोनाशी लढा देण्यासाठी 180 कोटींचा धनादेश दिला आहे.
Verification–
आम्ही या संदर्भात पडताळणी सुरु केली असता फेसबुकवर आम्हाला हाच दावा असणा-या अनेक पोस्ट आढळून आल्या.
याबाबत आम्ही गूगलमध्ये शोध घेतला पण आम्हाला अक्षय कुमारच्या कोरोना संदर्भातील काही बातम्या आढळून आल्या.
या बातम्यांमध्ये कुठेही अक्षय कुमारने 180 कोटींचा धनादेश दिल्याची माहिती नाही. त्यामुळे आम्ही अक्षय कुमारच्या ट्विटर हॅंडलवर या संदर्भात काही माहिती मिळते आहे का याचा शोध घेतला असता कोरोनापासून बचाव करण्यासाठी लाॅक डाऊन कसे गरजेचे आहे हे याचा त्याने व्हिडिओ पोस्ट केला असल्याचे आढळून आले.
त्याने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर देखील हा व्हिडिओ शेअर केला आहे. मात्र ट्विटर वा फेसबुक वर देखील अक्षय कुमार ने 180 करोड़ दिल्याचा उल्लेख केलेला नाही.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या वेबसाईटवर देखील यासंदर्भात माहिती नाही.
आम्ही अक्षय कुमार आणि आदित्य ठाकरे यांचा व्हायरल फोटो कधीचा आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता आम्हाला हा फोटो फेब्रुवारी महिन्यातील असून महिलांना सुरक्षिततेचे धडे दिल्याबद्दल आदित्य ठाकेरंनी अक्षय कुमारचे आभार मानले होते.
यावरुन हेच स्पष्ट होते की, अक्षय कुमारने महाराष्ट्र सरकारला 180 कोटींचा धनादेश दिलेला नाही. सोशल मीडियात भ्रामक पोस्ट शेअर केली जात आहे. असाच प्रकार बिग बी अमिताभ यांच्या बाबतीत झाल्याचे आढळून आले आहे. याचे देखील आम्ही
फॅक्ट चेकिंग केले आहे.
Source
Facebook
Google
Result- False
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)