अमिताभ बच्चनने कोरोनामुक्त झाल्यानंतर हाजी अली दर्ग्यात जाऊन चादर चढविली असल्याचा दाव्याची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. यात अमिताभ बच्चन यांचा फोटो शेअर करण्यात असून फोटोत त्यांच्याभोवती मुस्लिम टोपी घातलेले लोक दिसत आहे.

Fact Check/Verification
व्हायरल पोस्टच्या पडताळणीसाठी आम्ही रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने फोटोचा शोध घेतला. या शोधा दरम्यान आम्हाला इंडिया टुडेची 4 जुलै 2011 रोजी प्रसिद्ध झालेली बातमी आढळून आली. या बातमीनुसार अमिताभ बच्चन अजमेर शरीफ दर्ग्यात चादर चढविण्यास गेले होते. याच बातमीच्या फोटो गॅलरीत अमिताभचा सध्याचा हाजी अलीचा म्हणून व्हायरल होत असलेला फोटो देखील आढळून आला.

यानंतर आम्ही अमिताभ बच्चन अजमेर येथे गेल्याची माहिती मिळवण्याासाठी काही किवर्डसच्या आधारे शोध घेतला असता आम्हाला बाॅलिवुडच्या बातम्या देणारे टीवी चॅनल झूम च्या यूट्यूब चॅनलवर 6 जुलै 2011 रोजी अपलोड केलेला व्हिडिओ आढळून आला.
Conclusion
यावरुन हेच सिद्ध होते की अमिताभ बच्चन यांचा नऊ वर्षापूर्वीचा अजमेर दर्गा येथील फोटो आत्ताचा हाजी अली येथील असल्याचा चुकीचा दावा सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. कोरोनावर मात केल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी हाजी अली दर्ग्याला भेट दिलेली नाही.
Result- Misleading
Sources
इंडिया टुडे- https://www.indiatoday.in/movies/amitabh-bachchan/photo/amitabh-bachchan-visits-ajmer-sharif-365833-2011-07-04/5
झूम टिव्ही- https://www.youtube.com/watch?v=dni8tote9ro