नानावटी हाॅस्पिटलच्या डाॅक्टरांची प्रशंसा करणारा अमिताभचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अमिताभ बच्चन आणि आणि अभिषेक बच्चन पितापुत्र कोरोना पाॅझिटिव्ह आढळल्यानंतर अमिताभ यांना मुंबईतील नानावटी हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं आहे. याच दरम्यान अमिताभ यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून यात ते डाॅक्टरांची प्रशंसा करताना दिसत आहे. दावा करण्यात येत आहे की, बिग कोरोना पाॅझिटिव्ह आढळल्यानंतर ते हाॅस्पिटलमध्ये भरती झाल्यानंतरचा हा व्हिडिओ आहे.

पडताळणी
सोशल मीडियामध्ये व्हायरल होत असलेल्या अमिताभ बच्चनचा व्हिडिओ नेमका कधीचा आहे याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला असता आम्हाला याच दाव्याने हा व्हिडिओ फेसबुकवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे आढळून आले.
याशिवाय यूटयूबवर देखील आज तक या हिंदी वृत्तवाहिनीच्या बातमीचा व्हिडिओ आढळून आला ज्यात अमिताभ बच्चन यांनी नानावटी रुग्णालयातून डाॅक्टरांची प्रशंसा करणारा व्हिडिओ शेअर केल्याचे म्हटले आहे.
याशिवाय माय महानगर या युटूयब चॅनलवर देखील अमिताभ बच्चन यांचा व्हिडिओ आढळून आला. या विषयी माहिती देताना म्हटले आहे की, आज सकाळी अमिताभ बच्चन यांनी नानावटी रुग्णालयातूनच आपल्या या चाहत्यांसाठी, देशवासीयांसाठी आणि देशात कोरोनाशी लढा देण्यात सर्वात महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या डॉक्टर, नर्स आणि रुग्णालय कर्मचाऱ्यांसाठी एक व्हिडिओ संदेश जारी केला आहे.
अमिताभ बच्चन यांनी या व्हिडिओमध्ये एकदा ही कोरोना पाॅझिटिव्ह असल्याचा उल्लेख केलेला नाही.
अभिषेक बच्चन यांनी देखील एेश्वर्या आणि आराध्या देखील कोरोना पाॅझिटिव्ह असल्याचे ट्विट केेले आहे.
अमिताभ बच्चन यांनी कोरोना पाॅझिटिव्ह असल्याचा उल्लेख वरील व्हिडिओमध्ये कुठेही केलेला नाही. त्यामुळे हया व्हिडिओसदंर्भात अधिक माहिती मिळवण्याचा आम्ही प्रयत्न केला. आम्ही व्हिडिओमधून स्क्रिनशाॅट्स काढले आणि गूगल रिव्हर्स इमेजच्या आधारे शोध घेतला असता 25 एप्रिल 2020 रोजी पत्रिका या हिंदी वृत्तपत्राच्या वेबसाईटवर बातमी आढळून आली शिवाय व्हिडिओमधील अमिताभ यांचा फोटो देखील या बातमीत शेअर केला होता. यात म्हटले आहे कि, सूरतमध्ये लावलेल्या हार्डिंगचा अमिताभ यांनी आपल्या व्हिडिओमध्ये उल्लेख केला आहे. यात अमिताभ तुम्हा माहिती आहे का मंदिरं का बंद आहेत असा प्रश्न विचारत म्हणत आहे की, ईश्वर सध्या पांढरा कोट घालून हाॅस्पिटलमध्ये सेवा करत आहे. बातमीत पुढे म्हटले आहे की, देशांत कोरोना वाॅरियर्स डाॅक्टर आणि नर्सेसवर हल्ले होत आहेत. अशावेळी बिग बी अमिताभ बच्चन यांनी या कोरोना वाॅरियर्सना या व्हिडिओ प्रोत्साहन देत त्यांची प्रशंसा केली आहे.

अधिक शोध घेतला असता आम्हाला 23 एप्रिल रोजीची एबीपी न्यूज गुजराती (अस्मिता) च्या बातमी आढळून आली. ज्यात अमिताभ बच्चन यांचा सध्याचा व्हायरल होत असलेला व्हिडिओ शेअर कऱण्यात आला आहे.
यावरुन हेच स्पष्ट होते की, अमिताभ बच्चन यांनी नानावटी हाॅस्पिटलच्या डाॅक्टरांची प्रशंसा केलला व्हिडिओ आत्ताचा नाही तर दोन महिन्याआधीचा आहे. सध्या हा व्हिडिओ अमिताभ हाॅस्पिटलमध्ये अॅडमिट झाल्यानंतरचा असल्याचा भ्रामक दावा सोशल मीडियात करण्यात येत आहे.
Source
- Youtube
- Google Reverse Image
Result- Misleading
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला [email protected] वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)