आंध्रप्रदेशात कोरोना रुग्णांवर खाजगी व सरकारी हाॅस्पिटलमध्ये मोफत उपचार केले जाणार असल्याचा दावा करण्या-या अनेक पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. या म्हटले आहे की, आंध्रप्रदेशात सरकारी तसेज खाजगी रुग्णालयात कोरोनावर मोफत उपचार राज्य सरकारचा निर्णय… म्हणे महाराष्ट्र विकासात देशात प्रथम. महाराष्ट्र सरकार याचा आदर्श घेईल का?
काही पोस्टमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्रात असे झाले तर नक्कीच कोरोना 2-4 दिवसांत संपेल कारण कोरोनाचा चाललेला बाजार संपेल. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी कोरोना रुग्णांसाठी सगळीकडे मोफत उपचार देणार असल्याचे व्यक्तव्य केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानतर सोशल मीडियात हा दावा करण्यात आला आहे.




Fact Check/Verification
आंध्रप्रदेशात कोरोना रुग्णाना खरंच मोफत उपचार मिळत आहेत का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला असता आम्हाला Newsmeter या वेबसाईटवर या संदर्भात वृत्त प्रसिद्ध झाल्याचे आढळून आले. यात दिलेल्या माहितीनुसार आंध्रप्रदेशातील खाजगी रुग्णालयात कोरोना रुग्णांना मोफत उपचार मिळत नाहीत.
आंध्र प्रदेश सरकारने आर्थिक दुर्बल घटकातील लोकांसाठी आरोग्यश्री योजना आणलेली आहे, यात 5 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या रुग्णांना मोफत उपचार मिळणार आहेत. या योजनेतून आंध्र प्रदेशातील 5 कोटी जनतेमधील केवळ 1 ते दिड लाख लोकांना याचा फायदा मिळणार आहे. यामुळे हि योजना आंध्र प्रदेशातील सर्वच नागरिकांना लागू होत नाही.
न्यूजमीटरच्या वृत्तानुसार नेशनल एक्रीडिटेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स एंड हेल्थकेयर प्रोवाइडर्स हॉस्पिटल (NABH) द्वारे नाॅन क्रिटिकल COVID-19 ट्रीटमेंट साठी क्रमशः 4000 रुपये आणि 3,000 रुपये इतके शुल्क आकरण्यात आहे. ऑक्सीजन सह नॉन क्रिटिकल ट्रिटमेंट साठी क्रमशः 6,500 आणि 5,850 इतके शुल्क आकरण्यात आहे.
ICU आणि NIV सह क्रिटिकल COVID-19 ट्रिटमेंटसाठी NABH रुग्णालये और बिगर NABH रुग्णालयात क्रमशः 12,000 रुपये आणि 10,800 एवढे शुल्क निर्धारित करण्यात आले आहे. तसेच ICU आणि व्हेंटिलेटरसह क्रिटिकल ट्रिटमेंटसाठी NABH हाॅस्पिटल आणि बिगर NABH हाॅस्पिटलमध्ये 16000 रुपये आणि 14,400 रुपये शुल्क आकारले जाईल।
रुग्णालयांनी जास्त शुल्क आकारु नये यासाठी मुख्यमंत्र्यांनी अधिका-यांना कोरोना उपचारासाठी किंमती निश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. रूग्णालयांना अतिरिक्त शुल्क तसेच शुल्क व शुल्काबाबतच्या तक्रारींचे तपशील दाखवावे लागतील. जर एखाद्या रुग्णालयाने विहित शुल्कापेक्षा अधिक शुल्क आकारले तर कठोर कारवाई केली जाईल. असेही यात म्हटले आहे.
व्हायरल पोस्टमध्ये दावा करण्यात येत आहे की, महाराष्ट्रात देखील अशी आंध्रप्रदेशप्रमाणे मोफत उपचारांची योजना असायला हवी. मात्र ही योजना आधीपासूनच महाराष्ट्रात अस्तित्वात आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजना राज्य सरकाने आधीच सुरु केली असून 34 निवडक विशेष सेवा अंतर्गत 996 प्रकारच्या गंभीर व खर्चिक शस्त्रक्रिया आणि 121 शस्त्रक्रिया पश्चात सेवांचा लाभ घेता येत आहे. यात कोरोनाचा देखील समावेश करण्यात आला आहे.
या योजनेअंतर्गत पिवळी शिधापत्रिकाधारक, अंत्योदय अन्न योजना, अन्नपूर्णा योजना व केशरी (रु.1 लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न ) शिधापत्रिका धारक कुटुंबातील नागरीक, औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे तसेच नागपूर विभागातील वर्धा या शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रिका शेतकरी कुटुंबं देखील या योजनेचे लाभार्थी आहेत.
Conclusion
आमच्या पडताळणीत स्पष्ट झाले की, आंध्रप्रदेशात सर्व नागरिकांना कोरानाचे उपचार सरकारी व खाजगी हाॅस्पिटलमध्ये मोफत मिळणार असल्याचा दावा चुकीचा आहे. केवळ आर्थिक दुर्बल घटकातील लोकांनाचा याचा लाभ मिळणार आहे.
Read More : टाटा हेल्थ कंपनीने घरगुती कोविड-19 मेडिकल किट सुचविले आहे का?
Result: False
Claim Review: आंध्रप्रदेशात कोरोना रुग्णांवर खाजगी हाॅस्पिटलमध्ये मोफत उपचार Claimed By: Social Media post Fact Check: Misleading |
Our Sources
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.