Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Coronavirus
टाटा हेल्थ कंपनीने घरगुती कोविड-19 मेडिकल किट सुचविले असल्याचा एक मॅसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोरोनाचे टप्पे, कोणती औषधे घरात बाळगावीत तसेच कोरोना होऊ नये म्हणून नेमके काय करावे आहार काय घ्यावा इत्यादी माहिती यात देण्यात आली आहे.
आमच्या एका वाचकाने आम्हाला हा व्हाटअसएप्प मॅसेज पाठवला असून यासदंर्भात सत्यता पडताळणी करण्याची विनंती केली आहे.
संपूर्ण मॅसेज खाली वाचा
कोविड-१९ मेडिकल किट घरी आवश्यक आहे:
१. पॅरासिटामोल
२. माउथवॉश आणि गारगल साठी बीटाडाइन
३. व्हिटॅमिन सी आणि डी 3
५. बी कॉम्प्लेक्स
६. वाफ + वाफ + कॅप्सूल
७. ऑक्सिमीटर
८. ऑक्सिजन सिलिंडर (केवळ आपत्कालीन परिस्थितीसाठी)
९. आरोग्य सेतु अॅप
१०. व्यायाम व्यायाम
कोविड चे तीन टप्पे:
१. केवळ नाकातील कोविड –
बरे होण्यासाठी वेळ अर्धा दिवस आहे. (स्टीम इनहेलिंग, व्हिटॅमिन सी) सहसा ताप येत नाही. एसिम्प्टोमॅटिक.
२. घशातील कोविड –
घसा खवखवणे. बरे होण्यासाठी वेळ 1 दिवस. (गरम पाण्याचा गार्गल, पिण्यास गरम पाणी, जर ताप असेल तर पॅरासिटामोल, व्हिटॅमिन सी, बी कॉप्लेक्स, लक्षणे जास्त तीव्र असल्यास अँटीबायोटिक.)
३. फुफ्फुसातील(Lung) कोविड-
खोकला आणि श्वसनासाठी त्रास, दम 4 ते 5 दिवस. (व्हिटॅमिन सी, बी कॉम्प्लेक्स, गरम पाण्याचे गार्गल, ऑक्सिमीटर, पॅरासिटामॉल, ऑक्सिजन सिलेंडर गंभीर असल्यास, भरपूर गरम पाणी आवश्यक आहे. श्वासोच्छवासाचा प्राणायाम कपालभारती सारखे व्यायाम करा.)
इस्पितळात कधी जायचे अशी अवस्थाः
ऑक्सिजनच्या पातळीवर (सामान्य पातळी 98-100) लक्ष ठेवा. जर पातळी 93 च्या जवळ गेली तर आपल्याला ऑक्सिजन सिलेंडरची आवश्यक लागणार आहे. जर सिलेंडर घरी उपलब्ध असेल तर इतर कोणत्याही रुग्णालयात दाखल होण्याची गरज लागणार नाही.
निरोगी रहा, सुरक्षित रहा!
कृपया भारतातील आपल्या संपर्कांवर चर्चा करा. ह्याची कोणाला मदत होईल हे आपल्याला आता सांगता येणार नाही.
टाटा समूहाने चांगला उपक्रम सुरू केला आहे. ते गप्पांच्या माध्यमातून डॉक्टरांचा विनामूल्य सल्ला सल्ला देत आहेत. ही सुविधा आपल्यासाठी सुरू केली गेली आहे; जेणेकरून आपल्याला डॉक्टरांकडे जाण्याची आवश्यकता नाही आणि आपण घरीच सुरक्षित राहाल.
खाली लिंक आहे. मी सर्वांना या सुविधेचा लाभ घेण्यासाठी विनंती करतो.
https://www.tatahealth.com/online…/general-physician
+91 74069 28123 विलगिकरण रुग्णालयातील सल्ला, आम्ही घरी करू शकतो.
पुढीलऔषधे रुग्णालयात घेतली जातात-
*१. व्हिटॅमिन सी -1000
*२. व्हिटॅमिन ई (ई)
*३. (10 ते 12 तासांतून) उन्हात 15-20 मिनिटे बसा
*४. अंड्याचे(Egg) जेवण, रोज एकदा.
*५. आम्ही किमान 7-8 तास विश्रांती घेतो/झोपतो
*६. आम्ही दररोज 1.5 लिटर पाणी पितो
*७. सर्व जेवण उबदार(थंड नाही) असावे.
रोगप्रतिकारक यंत्रणा बळकट करण्यासाठी आम्ही हॉस्पिटलमध्ये इतकेच करतो.
लक्षात घ्या की कोरोनाव्हायरसचे पीएच 5.5 ते 8.5 पर्यंत असते
*म्हणूनच, व्हायरसच्या उच्चाटनासाठी आपल्याला जे करायचे आहे ते म्हणजे; व्हायरसच्या आंबटपणाच्या पातळीपेक्षा जास्त क्षारीय पदार्थांचे सेवन करणे. जसे:
*केळी
*हिरवा लिंबू – 9.9 पीएच
*पिवळा लिंबू – 8.2 पीएच
*एवोकॅडो – 15.6 पीएच
*लसूण – 13.2 पीएच
*आंबा – 8.7 पीएच
*टेंजरिन – 8.5 पीएच
*अननस – 12.7 पीएच
*वॉटरक्रिस – 22.7 पीएच
*संत्री – 9.2 पीएच
आपल्याला कोरोना विषाणूची लागण झाली हे कसे कळेल?
*१. घसा खवखवणे
*२. कोरडा घसा
*३. कोरडा खोकला
*४. उच्च ताप
*५. श्वास लागणे
*६. गंध वास कमी होणे
कोमट पाण्यात लिंबू पिळून पिल्याने फुफ्फुसांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच व्हायरसला सुरवातीलाच नष्ट करते
ही माहिती फक्त स्वतःजवळच ठेवू नका. आपले सर्व नातलग आणि मित्रांना पाठवा.
🙏🏼🌷धन्यवाद🌷🙏🏼
फेसबुकवर देखील आम्हाला ही पोस्ट आढळून आली.
टाटा हेल्थ कंपनीने कोविड-19 संदर्भात खरंच मेडिकल किट सुचवले आहे का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला मात्र आम्हाला मुख्य प्रवातील माध्यमांनी याबद्दल बातमी दिल्याचे आढळून आले नाही. यानंतर आम्ही मॅसेजमधील वेबसाईटला भेट दिली पण यातून काही पण आम्हाला या वेबसाईटवर अशी कोणतीही माहिती आढळून आली नाही.
आम्ही कंपनीच्या ट्विटर हॅंडडला भेट दिली असता आम्हाला कंपनीने मागील वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान 16 जून 2020 रोजी केलेले ट्विट आढळून आले. यात त्यांनी म्हटले आहे की, कोविड-19 मेडिकल किटची माहिती टाटा हेल्थने प्रसारित केलेली नाही. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही उपचार करू नका आणि खोट्या मेसेजवर विश्वास ठेवू नका.
यानंतर आम्ही कोरोना चे खरंच तीन टप्पे असतात का या शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र आम्हाला कोविडचे नाकातील कोरोना, घशातील कोरोना आणि फुफ्फुसातील कोरोना असे तीन टप्पे असतात याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या वेबसाईटवर देखील मिळाली नाही.
तसेच कोरोनाव्हायरसचे पीएच 5.5 ते 8.5 पर्यंत असते या दाव्याला देखील काही आधार नाही. आयएमए महाराष्ट्रचे डाॅ. अविनाश भोंडवे यांच्या म्हणण्यानुसार कोरोनाला पीएच असतो हे निरर्थक आहे. याला शास्त्रीय आधार नाही. पीएच मूल्य केवळ 0 ते 14 दरम्यान असते. पोस्टमध्ये काही पदार्थांचे पीएच मूल्य 15 आणि 22 असते सांगितले आहे.हे पूर्णता चुकीचे आहे.
पोस्टमध्ये कोमट पाण्यात लिंबू पिळून पिल्याने कोरोना फुफ्फुसापर्यंत पोहोचण्यापूर्वीच मरतो असा दावा करण्यात आला आहे. त्यात देखील तथ्य नाही. कारण जागतिक आरोग्य संघटनेने लिंबाच्या कोमट पाण्याने कोरोना नष्ट होत असल्याचा कोणताही पुरावा नसल्याचे स्पष्ट केले आहे.
आमच्या पडताळणीत स्पष्ट झाले की, व्हायरल फोटो सचिन वाझेच्या फ्लॅटवरील कारवाई दरम्यान सापडेल्लाय घबाडाचे नसून देशात वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या धाडी दरम्यान मिळालेल्या पैशांचे व ज्वेलरीचे आहेत.
Read More : शेतकरी नेते राकेश टिकेत यांना राजस्थानात काळे फासण्यात आले आहे का?
Claim Review: टाटा हेल्थ कंपनीने कोविड-19 मेडिकल किट सुचविले आहे. Claimed By: Social Media post Fact Check: False |
WHO- https://www.who.int/southeastasia/outbreaks-and-emergencies/novel-coronavirus-2019/fact-or-fiction
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.
Prasad S Prabhu
December 29, 2022
Yash Kshirsagar
March 24, 2021
Yash Kshirsagar
June 1, 2021