Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Coronavirus
महाराष्ट्रात कोरोनाच्या दुस-या लाटेत रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर राज्य सरकारने 1 जून पर्यंत लाॅकडाऊन लागू केला आहे, मात्र आता लाॅकडाऊन संपण्यास 10 दिवस बाकी असताना 1 जून नंतरची अनलाॅकची नियमावली सांगणारा टिव्ही 9 मराठीच्या बातमीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात टप्प्याटप्प्याने अनलाॅक होणार असल्याचे व कशा प्रकारे शिथिलता मिळणार आहे याविषयी माहिती देण्यात आली आहे.
सध्या या बातमीचा व्हिडिओ व्हाट्सअॅपवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.यात तीन जून ते 8 जून दरम्यान लाॅकाऊन मध्ये तीन टप्प्यांत शिथिलता मिळणार असल्याचे म्हटले आहे. पहिल्या टप्प्यात 3 जूनला तर नंतर 5 व नंतर 8 जूनला शिथिलता हळूहळून कमी होणार असल्याचे म्हटले आहे. आमच्या काही वाचकांनी हा व्हिडिओ आम्हाला पाठविला असून आम्हाला याविषयी सत्यता पडताळणी करण्यास सांगितले.
महाराष्ट्रात खरंच 1 जून नंतर अनलाॅकची प्रक्रिया सुरु होणार आहे का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला यासाठी आम्ही बातम्या शोधण्यास सुरुवात केली मात्र याबाबत अधिक माहिती मिळाली नाही. यानंतर सीएमओच्या ट्विटर हॅंडलला भेट दिली मात्र तिथेही आम्हाला 1 जून नंतर अनलाॅकची प्रक्रिया सुरु होणार असल्याची माहिती मिळाली नाही. कोरोना काळात मोफत केलेली शिवभोजन थाळी 24 जून पर्यंत मोफत मिळणार असल्याचे ट्विट आढळून आले. पण 1 जून नंतर काय सुरु राहणार आणि काय बंद राहणार याची माहिती आढळून आलेली नाही.
अधिक शोध घेतला असता आम्हाला लोकसत्ताच्या वेबसाईटवर 1 जूननंतर लाॅकडाऊन वाढणार की नाही या प्रश्नावर मुख्यंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिल्याची बातमी आढळून आली. या बातमीत म्हटले आहे की,करोनाची रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी राज्यात ठाकरे सरकारकडून लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. याआधी राज्य सरकारने १५ मे पर्यंत लॉकडाउन जाहीर केला होता, त्यानंतर १ जूनपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी राज्य सरकारने निर्बंधदेखील कठोर केले आहेत. दरम्यान राज्यात रुग्णसंख्या आटोक्यात येत असली तरी काळ्या बुरशीचं संकट, लसींचा तुटवडा आणि तिसऱ्या लाटेला सामोरं जाण्यासाठी लागणारी तयारी यामुळे लॉकडाउन वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउनसंबंधी महत्वाचं विधान केलं आहे. ते रत्नागिरीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
महाराष्ट्रात करोना स्थितीसंबंधी विचारण्यात आलं असता उद्धव ठाकरे म्हणाले की, “करोना कमी होतोय हे नक्कीच पण त्यासंबंधी काही बोलणार नाही. गेल्या लाटेच्या वेळी आपण अनुभव घेतला आहे. गेल्यावेळीही आपण करोनावर नियंत्रण मिळवलं होतं. पण थोडीशी शिथिलता आली आणि कोविड चौपटीने वाढला”.
“सध्याचा करोना विषाणू फार घातक आहे, अत्यंत वेगाने पसरतो. काही पटींमध्ये लोकांना हा बाधित करत आहे. सध्या गेल्या वेळच्या तुलनेत वाईट परिस्थिती आहे हे लक्षात घेतल्यानंतर पुढे कधी आपण निर्बंध शिथील करु तेव्हा मागील अनुभवातून शहाणं व्हावं लागेल. सुरक्षेचे नियम पाळावेच लागतील,” असंही ते म्हणाले. दरम्यान लॉकडाउन वाढणार का असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “सध्या परिस्थिती आटोक्यात असून त्यानुसार नंतर निर्णय घेऊ, पण कोणीहा गाफील राहू नये”.
यावरुन स्पष्ट झाले की राज्यात अनलाॅकची प्रक्रिया सुरु होणार असल्याचे ठोस उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेले नाही. याशिवाय आम्हाला CNBC ने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची मुलाखत 19 मे रोजी मुलाखत घेतल्याता व्हिडिओ युट्यूबवर आढळला यात त्यांना 1 जूनमनंतर लॉकडाऊन शिथिल होणार का असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी रुग्णांची आकडेवारी पाहून यावर निर्णय घेतला जाईल असे उत्तर दिले होते. आदित्य ठाकरे यांनी देखील मुलाखतीत कुठेही अनलाॅकची प्रक्रिया सुरु होणार असल्याचे म्हटलेले नाही.
यानंतर आम्ही टिव्ही 9 मराठीची बातमी कधीची आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओमध्ये अनलाॅक 5 चा उल्लेख असल्याने आम्ही यात किवर्डसच्या आधारे शोध घेतला असता आम्हाला 31 मार्च रोजी 2020 रोजी टिव्ही 9 मराठीच्या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेली बातमी आढळून आली. यात राज्य सरकारने दिलेल्या गाईडलाईन्सनुसार, येत्या 3 जूनपासून राज्यात आणखी काहीशी मोकळीक देण्यात येणार आहे. राज्यातील कंटेंन्मेंट झोन वगळता जनजीवन सुरु करण्यात येणार आहे. राज्यात सायकलिंग, रनिंग, वॉक, व्यायाम या सर्व गोष्टींना परवानगी देण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक मैदानेही खुली केली जाणार आहे. इतकंच नव्हे तर समुद्र किनाऱ्यांवर जाण्यासही परवानगी देण्यात आल्याचे म्हटले आहे.
याशिवाय आम्हाला सध्या व्हायरल होत असलेला टिव्ही 9 मराठीच्या बातमीचा व्हिडिओ देखील युट्यूबवर आढळून आला. हा व्हिडिओ देखील 31 मे 2020 रोजी अपलोड करण्यात आला आहे.
आमच्या पडताळणीत स्पष्ट झाले की, 1 जून नंतर लाॅकडाऊन संपणार की नाही याचे ठोस उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलेले नाही, तसेच व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा मागील वर्षीचा आहे, सध्याचा नाही.
Read More : देशी दारुच्या काढ्याने कोरोना रुग्ण बरे होत असल्याचा डाॅक्टरचा दावा, जाणून घ्या सत्य
Claim Review: राज्य सरकारने जारी केली 1जून नंतरची अनलाॅकची नियमावली Claimed By: Social Media post Fact Check: Misleading |
टिव्ही 9 मराठी – https://www.youtube.com/watch?v=bZZmWy69SSs&t=181s
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.