महाराष्ट्रात कोविड-19 ची प्रकरणे वाढल्यामुळे राज्य सरकारला अनेक निर्बंध लावावे लागले आहेत. अमरावतीत 22 फेब्रुवारी रोजी लॉकडाउन लागू करण्यात आले आहेत. ज्याची मुदत 8 मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे. अशा परिस्थितीत एक व्हिडिओ सोशल मीडियात शेअर केला जात आहे. लॉकडाऊनचे उल्लंघन करणार्यांवर पोलिस लाठीचार्ज करीत असल्याचा दावा केला जात आहे.
आमच्या एका वाचकाने हा व्हिडिओ नेमका कुठला आणि कधीचा आहे याची पडताळणी करण्यासाठी ही पोस्ट आम्हाला पाठविली आहे.

Fact Check / Verification
अमरावतीत लाॅकडाऊन दरम्यान पोलिस रस्त्यावर फिरणा-या लोकांवर लाठीचार्ज करत आहेत का याचा शोध घेण्याचा आम्ही शोध घेतला. या शोधा दरम्यान आम्हाला पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची बातमी आढळून आली. त्यानंतर आम्ही व्हायरल पोस्टमधील व्हिडिओतील काही किफ्रेम्स काढल्या आणि Google Reverse image च्या साहाय्याने शोध घेतला.
या शोधादरम्यान आम्हाला 25 आणि 26 मार्च 2020 रोजीच्या ब-याच सोशल मीडिया पोस्ट आढळून आल्या. ज्यात हा व्हायरल व्हिडओ शेअर करण्यात आला आहे. यावरुन हे स्पष्ट होते की, हा व्हिडिओ या वर्षीचा नाही.
आम्हाला ‘नॅशनल नेक्स्ट’ आणि ‘महासंवाद मीडिया’ नावाची दोन यूट्यूब चॅनेल्स आढळून आली. ज्यात सुमारे एक वर्षापूर्वी हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता. वर्णनात हा व्हिडिओ अमरावतीचा असल्याचे म्हटले आहे.
व्हिडिओमध्ये एक इमारत दिसत आहे ज्यावर त्यावर ‘आसाम टी सेंटर’ लिहिलेले आहे. ही इमारत महानगर पालिका कॉम्प्लेक्स, राजकमल चौकात आहे. आम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेले फुटेजची आणि Google Maps वरील 360-डिग्री स्ट्रीट व्यू वर उपलब्ध लोकेशनची तुलना करुन पाहिली असता आम्हाला दोन्हींत समानता आढळून आली.
व्हायरल व्हिडिओ आसाम टी सेंटर दिसत आहे त्याचा शोध घेतला अमरावतीमधीलच तेच आसाम टी सेंटर असल्याचे जस्ट डायलच्या फोटोवरुन लक्षात आहे. आम्ही दोन्हीची तुलना करुन पाहिली दोन्ही एकच असल्याचे आढळून आले.

Conclusion
यावरुन हे स्पष्ट होते की, अमरावतीतील पोलिसांच्या लाठीचार्जचा व्हिडिओ आताच्या लाॅकडाऊनमधील नाहीत तर मागील वर्षीचा आहे.
Result- Misleading
Our Sources
Nation Next- https://www.youtube.com/watch?v=quThDr2b3do&has_verified=1
Mahasanvad Media– https://www.youtube.com/watch?v=dZZM5N1hycI
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला [email protected] वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.