Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Coronavirus
दोन पोलिस कर्मचारी एका तरुणाला काठीने बेदम मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. दावा करण्यात येत आहे की राज्यात काही ठिकाणी लाॅकडाऊन लागू करण्यात आला आहे तसेच ब-याच ठिका निर्बंध देखील लावण्यात आले आहेत. अशातच मंचरमधील एक तरुण आपल्या आईवडिलांना शेतात डबा घेऊन जात असताना पोलिसांनी त्याला अमानुष मारहाण केली असल्याच्या दाव्याने हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
व्हायरल पोस्टमध्ये म्हटले आहे की, “आई-वडिलांना शेतात डबा घेऊन निघालेल्या मुलाला मंचर गावामध्ये राक्षसी वृत्तीच्या पोलिसांची अमानुषपणे मारहाण..तो मुलगा सॉरी बोलतोय तरी सुद्धा या पोलिसांना थोडा पण फरक पडत नाहीये. हा व्हिडिओ सर्वांनी व्हायरल करावा म्हणजे पोलिसांना त्यांच्या राक्षसी कृत्याची शिक्षा मिळेल..”
हा व्हिडिओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. फेसबुकवर आम्हाला याच दाव्याने व्हायरल होत असलेल्या अनेक पोस्ट आढळून आल्या.
पोलिसांनी लाॅकडाऊन दरम्यान मंचरमधील युवकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ कधीचा आहे याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या पुन्हा वेगाने वाढल्याने पुणे शहर आणि जिल्ह्यात लाॅकडाऊनचीचर्चा सुरु झाली होती अशातच हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
आम्ही मंचरमध्ये युवकाला मारहाण झाल्याचा व्हिडिओ कधीचा आहे याचा शोध घेण्यास सुरुवात केली. या शोधादरम्यान आम्हाला हाच व्हिडिओ फेसबुकवर मागील वर्षी एप्रिल महिन्यात अपलोड करण्यात आल्याची आढळून आले.
यावरुन हे सिद्ध झाले की हा व्हिडिओ मागील वर्षीच्या कडक लाॅकडाऊन दरम्यानचा आहे. याबाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आम्ही काही किवर्डसच्या माध्यमातून गूगल सर्च केले असता आम्हाला महाराष्ट्र टाईम्सची 5 एप्रिल 2020 रोजीची बातमी आढळून आली. यात मंचर पोलिस ठाण्याच्या दोन कर्मचा-यांनी तरुणाला अमानुष मारहाण केल्याची माहिती देण्यात आली आहे.
मटाच्या बातमीत म्हटले आहे की, करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठ लाॅकडाऊनी लागू केला आहे. लॉकडाऊनदरम्यान कुणीही विनाकारण बाहेर पडल्यास त्याला पोलिसांच्या कारवाईला सामोरं जावं लागत आहे. काहींना पोलिसांकडून लाठीचा ‘प्रसाद’ दिला जात आहे. मात्र, काही ठिकाणी पोलिसांकडून मारहाण होत असल्याच्या घटना उघडकीस आल्यानंतर, नागरिकांशी सौम्यपणे वागा, त्यांना आधी कारण विचारा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. पण त्यानंतरही पोलिसांकडून नागरिकांना मारहाण होतच आहे. मंचरमधील गावडेवाडी येथील एका तरुणालाही पोलिसांनी अमानुष मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. हा तरुण शुक्रवारी शेतावर काम करणाऱ्या वृद्ध आई-वडिलांना जेवणाचा डबा घेऊन दुचाकीवरून जात होता. त्याच्यासोबत आणखी एक जण होता. गावडेवाडी फाटा येथे या तरुणाला पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी अडवले आणि दंडुक्यानं मारहाण करण्यास सुरुवात केली.
माझे आईवडील शेतावर काम करत आहेत. त्यांच्यासाठी जेवणाचा डबा घेऊन जात असल्याचं या तरुणानं सांगितलं. चुकी झाली, माफ करा, अशी विनवणीही केली. मात्र, पोलीस कर्मचारी काहीच ऐकून न घेता मारहाण करत असल्याचं या व्हिडिओत दिसत आहे. काठीनं मारहाण केल्यानंतर इतक्यावरच समाधान झालं नाही. या पोलीस कर्मचाऱ्यानं त्याच्या थोबाडीत मारली. तसंच काठीनं मानेवरही जोरदार प्रहार केला. एका नागरिकानं या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर तो पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. तरुणांना अमानुष मारहाण करणाऱ्या या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.
दैनिक लोकमत देखील ही बातमी त्यावेळी प्रसिद्ध केली होती. यात म्हटले आहे की, अवसरी येथील युवक आपल्या वृद्ध आईवडिलांना शेतात जेवण घेऊन जात असताना पोलिसांनी अमानुष मारहाण केली, याचा व्हिडिओ तेथील एका सजग नागरिकाने शूट केला. हा व्हिडिओ व्हायरल होताच नागरिकांनी पोलिसांच्या या अमानवी कृत्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. या प्रकाराची गंभीर दखल घेत पोलिस अधिक्षकांनी संबंधित पोलिस कर्मचा-याची तडकाफडकी पुण्यात बदली केली.
आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की, व्हायरल व्हिडिओ मागील वर्षीचा आहे, पोलिस कर्मचा-याचे हे अमानुष कृत्य उघड झाल्यानंतर त्याची बदली करण्यात आली होती.
महाराष्ट्र टाईम्स- https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/coronavirus-police-beaten-up-boys-during-lockdown-in-manchar-video-goes-viral/articleshow/74993308.cms
लोकमत- https://www.lokmat.com/pune/policeman-brutally-assaulted-young-man-who-going-tifin-elderly-parents-events-avsari-budruk/
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.
Prasad S Prabhu
May 28, 2025
Komal Singh
February 24, 2025
Prasad S Prabhu
January 31, 2025