गरम पाण्याची वाफ घेतल्याने कोरोना नष्ट होत असल्याचा दावा सोशल मीडियात केला जात आहे. यात म्हटले आहे की, नाकाने किंवा तोंडाने गरम पाण्याची वाफ घेतल्यास कोरोना 100 टक्के नष्ट होतो. आम्हाला शेअरचॅट या सोशल मीडिया प्लॅटफार्मवर हा दावा आढळून आला. यात ही माहिती सर्वांना पाठवण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.

पडताळणी
गरम पाण्याची वाफ घेतल्यास खंरच कोरोना नष्ट होतो का याबबत आम्ही पडताळणी सुरु केली. याबाबत काही किवर्डसच्या आधारे शोध घेतला असता आम्हाला दैनिक लोकमतच्या वेबसाईटवर एक लेख आढळून आला. ज्यात म्हटले आहे की कोरोनाच्या संक्रमणापासून वाचण्यासाठी लोक गरम पाण्याची वाफ घेत आहेत, मात्र अधिक वाफ घेणे हे शरीरासाठी घातक असल्याचे देखील या लेखात सांगितले आहे. वाफ घेतल्याने श्वास घेण्यास समस्या उद्भवत नाही असेही यात म्हटले आहे. पण कोरोना बरा होत असल्याचा दावा या लेखात केलेला नाही.

अधिक माहिती घेतली असता आम्हाला सेन्टर फॉर रेस्टॉरंट्स कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेंशन या अमेरिकेतील संस्थेच्या वेबसाईटवर देखील हीच माहिची मिळाली यात म्हटले आहे की गरम पाण्याची वाफ घेतल्याने सर्दीच्या समस्येपासून सुटका होते. यात देखील कुठेही गरम वाफेमुळे कोरोना बरा होत असल्याचा दावा करण्यात आलेला नाही.

याशिवाय पीआयबीने देखील गरम वाफेच्या दाव्या संदर्भात ट्टिट करुन व्हायरल दावा असत्य असल्याचे सांगितले आहे. ट्विटमध्ये म्हटले आहे की कोरोना गरम वाफेमुळे नष्ट होतो या कोणताही शास्त्रीय आधार नाही.
याशिवाय जागतिक आरोग्य संघटनेच्या वेबसाईटवर कोरोना कसा रोखता येईल व त्यापासून कसा बचाव करता येईल यासाठी नेमके काय करावे याची माहिती दिली आहे मात्र यात कुठेही गरम वाफ घेतल्यास कोरोना नष्ट होत असल्याचा उल्लेख नाही.

यावरुन हेच स्पष्ट होते की, गरम पाण्याची वाफ घेतल्याने कोरोना 100 टक्के नष्ट होतो हा दावा असत्य आहे.
Source
- Sharechat
Result- False
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला [email protected] वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)