आठवडाभर गरम वाफ घेतली तर कोरोना नष्ट होऊ शकतो असा दावा करणारी पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. यात म्हटले आहे की, जर कोविड -1 नाक-तोंडातून वाफेने मारला गेला तर कोरोना नष्ट होऊ शकतो. जर सर्व लोकांनी एका आठवड्यासाठी स्टीम ड्राइव्ह मोहिम सुरू केली तर करोना संपू शकतो.
पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, वरील दिशेने हे कार्य करण्यासाठी, आम्ही जगभरातील लोकांना विनंती करतो की 2 सप्टेंबर ते 8 सप्टेंबर या कालावधीत सकाळी आणि संध्याकाळी एका आठवड्यासाठी स्टीम प्रक्रिया सुरू करावी. स्टीम उचलण्यासाठी फक्त 05-05 मिनिटे. एका आठवड्यासाठी ही प्रथा अवलंबून, आम्हाला विश्वास आहे की प्राणघातक कोविड -१ era मिटविला जाईल*.असे केल्याने फायदा होईल, कोणतेही दुष्परिणाम नाहीत.
Fact Check / Verification
गरम पाण्याची वाफ घेतल्यास खंरच कोरोना नष्ट होतो का याबबत आम्ही पडताळणी सुरु केली. याबाबत काही किवर्डसच्या आधारे शोध घेतला असता आणखी दावा फेसबुकवर आढळून आला.

याशिवाय व्हाट्सअॅप्पवर देखील हा दावा मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे आढळून आले.

आम्हाला दैनिक लोकमतच्या वेबसाईटवर एक लेख आढळून आला. ज्यात म्हटले आहे की कोरोनाच्या संक्रमणापासून वाचण्यासाठी लोक गरम पाण्याची वाफ घेत आहेत, मात्र अधिक वाफ घेणे हे शरीरासाठी घातक असल्याचे देखील या लेखात सांगितले आहे. वाफ घेतल्याने श्वास घेण्यास समस्या उद्भवत नाही असेही यात म्हटले आहे. पण कोरोना बरा होत असल्याचा दावा या लेखात केलेला नाही.
धिक माहिती घेतली असता आम्हाला सेन्टर फॉर रेस्टॉरंट्स कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेंशन या अमेरिकेतील संस्थेच्या वेबसाईटवर देखील हीच माहिची मिळाली यात म्हटले आहे की गरम पाण्याची वाफ घेतल्याने सर्दीच्या समस्येपासून सुटका होते. यात देखील कुठेही गरम वाफेमुळे कोरोना बरा होत असल्याचा दावा करण्यात आलेला नाही.

जागतिक आरोग्य संघटनेच्या वेबसाईटवर कोरोना कसा रोखता येईल व त्यापासून कसा बचाव करता येईल यासाठी नेमके काय करावे याची माहिती दिली आहे मात्र यात कुठेही गरम वाफ घेतल्यास कोरोना नष्ट होत असल्याचा उल्लेख नाही.

आम्ही इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)चे महाराष्ट्र राज्य शाखेचे अध्यक्ष डाॅ. भोंडवे यांच्याशी याबाबत संपर्क साधून माहिती घेतली असता त्यांनी सांगितले की,
करोनाचा विषाणू श्वासांद्वारे घशात जातो व घशातील पातळ पडद्यांद्वारे पेशीत उतरतो. शरीरात त्याचे पुनरुत्पादन होत असते. त्यामुळे वाफ घेतली तरी शरीरांतर्गत वाढणारे कोरोनाचे विषाणू नष्ट होत नाही. जर हे विषाणू शरीराबाहेर प्रयोगशाळेत वा अन्य ठिकाणी गरम पाण्यात मिसळले तर नष्ट होतात.
Conclusion
यावरुन हेच सिद्ध होते की, आठवडाभर गरम पाण्याची वाफ घेतली तर कोरोना नष्ट होणार असल्याचा दावा असत्य आहे. शरीरातर्गंत पसरलेल्या कोरोना विषाणूवर गरम वाफेचा काहीही परिणाम होत नाही. सोशल मीडियात खोटा दावा व्हायरल होत आहे.
Result- False
Sources
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला [email protected] वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.