Claim– लाॅकडाऊन मध्ये ब्लॅक ने दारु विकत घेताना सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना पोलिसांनी अटक केली.

दाव्याचे संक्षिप्त विवरण-
सोशल मीडियामध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्या हातातून महिला पोलिस बाटल्यांचा हार घेताना तसेच नंतर पोलिस त्यांना आपल्या गाडीत घेऊन जाताना दिसत आहेत. या व्हिडिओविषयी दावा करण्यात येत आहे की लाॅकडाऊनच्या काळात तृप्ती देसाई ब्लॅकने दारू विकत घेत होत्या त्यावेळी पोलिसांनी त्यांना अटक केली.
Verification
आम्ही या संदर्भात पडताळणी सुरु केली. याबाबत काही मिळते का ते पाहण्यासाठी गूगलमध्ये शोध सुरु केला असता फेसबुकवर व्हायरल व्हिडिओ मोठ्या प्रमाणात यात दाव्याने शेअर होत असल्याचे आढळून आले.

याबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी आम्ही शोध सुरुच ठेवला पण याबद्दलची बातमी मुख्य प्रवाहातील माध्यमांत देखील आढळून आली नाही. यानंतर आम्ही व्हायरल व्हिडिओमधून काही स्क्रिनशाॅट्स काढले आणि काही किवर्ड्सच्या आधारे इनव्हिडच्या साहाय्याने शोध सुरु ठेवला असता आम्हाला मागील वर्षी सरकानामा या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेली बातमी आढळून आली. यात म्हटले आहे की महाराष्ट्रात दारुबंदीचीं मागणी करत मुख्यमंत्र्यांना दारुंच्या बाटल्यांचा हार अर्पण करण्याचे आंदोलन करण्याच्या विचारात असलेल्या भुमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांना दुपारीच पोलिसांनी त्यांच्या निवास्थानावरुन ताब्यात घेतले.

यानंतर आम्हाला हीच बातमी दर्शन पोलिस टाईम्स या वेबसाईटवर देखील ही बातमी आढळून आली.

यावरुन हेच स्पष्ट झाले की हा व्हिडिओ सध्याचा संचारबंदीच्या काळातील नाही कारण यामध्ये पोलिसांनी देखील मास्क घातल्याचे दिसत नाही. तसेच रस्त्यावर ब-यापैकी गर्दी दिसत आहे.
या व्हिडिओचे सत्य जाणून घेण्यासाठी Newschecker.in टीमने तृप्ती देसाई यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी” महाराष्ट्रात दारूबंदी करावी” यासाठी देवेंद्र फडणवीस जेव्हा हा जनादेशयात्रा करीत होते तेव्हा त्यांचा पुण्यात दौरा असताना “दारूबंदी करा” यासाठी मी दारूच्या बाटल्यांचा हार मुख्यमंत्र्यांना घालायला निघाले असताना मला त्यावेळी राहत्या घरातून पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी ताब्यात घेतले होते….
महाराष्ट्रात दारूबंदी झाली पाहिजे यासाठी गेले तीन वर्ष मी काम करीत आहे आणि दारूबंदीसाठी केलेल्या आंदोलनाचा जुना व्हिडिओ व्हायरल करून “सदर व्हिडिओ मध्ये तृप्ती देसाईना लॉकडाऊनमध्ये दारू घेताना पकडले “असे खोटे पसरवून काही इसम मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. सायबर क्राईमने तातडीने या सर्वांवर कारवाई करावी अशी मी मागणी केलेली आहे.
यावरुन हेच स्पष्ट होते की तृप्ती देसाई यांना लाॅकडाऊनमध्ये दारु विकत घेताना अटक झालेली नाही. ती एक सोशल मीडियात पसरवण्यात आलेली अफवा आहे. जुना व्हिडिओ खोट्या दाव्यानिशी व्हायरल करण्यात आला आहे.
Source
Facebook
Google Search
Invid
Result- Misleading
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला [email protected] वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)