सोशल मीडियात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याचे दिसत आहेत. दावा करण्यात येत आहे की, हा व्हिडिओ सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाचा आहे. मागील आठवड्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे सगळीकडे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. अशातच हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Fact Check / Verification
व्हायरल व्हिडिओ कोयना धरणाचा आहे की नाही हे शोधण्यासाठी आम्ही पडताळणी सुरु केली.आम्हाला 23 जुलै 2021 रोजी द हिंदूच्या अधिकृत ट्विटर हँडलवर केलेले एक ट्विट सापडले, यात कोयना धरणाच्या व्हिडिओसह धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असल्याचा व्हिडिओ आढळून आला.
मात्र व्हायरल व्हिडिओ आणि द हिंदूच्या ट्विटमधील व्हिडिओ वेगळा असल्याने आम्ही व्हायरल व्हिडिओबाबत अधक जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, आम्ही Invid टूलच्या मदतीने व्हिडिओला काही कीफ्रेममध्ये रूपांतरित केले आणि नंतर गुगलवर रिव्हर्स इमेज टूलसह कीफ्रेम शोधण्यास सुरुवात केली.
या शोधादरम्यान, आम्हाला 2018 मध्ये Vsinghbisen या यूट्यूब चॅनेलवर अपलोड केलेल्या व्हिडिओत व्हायरल व्हिडिओ क्लिपचे फुटेज सापडले. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, हे दृश्य चीनच्या ‘येलो’ नदीवरील शियाओलंगडी धरणाचे आहे. (Xiaolangdi Dam) आहे.

मिळालेल्या व्हिडिओसोबत कॅप्शन लिहिले होते ‘Xiaolangdi Dam in china’’. याची पुष्टी करण्यासाठी, आम्ही Google वर कीवर्डच्या मदतीने शोध सुरू केला. दरम्यान, आम्हाला चीनी भाषेतील फेसबुक पेजवर धरणाचा आणखी एक व्हिडिओ सापडला, जिथे व्हायरल व्हिडीओतील दृश्य अधिक चांगले स्पष्ट दिसते.

Conclusion
आमच्या पडताळणीत स्पष्ट झाले की, व्हायरल व्हिडिओ कोयना धरणातून सोडलेल्या पाण्याचा नाही तर चीनमधील हेनान प्रांतातील शियाओलंगडी (Xiaolangdi) धरणाचा आहे.
Result-Misleading
Our Sources
VSINGHBISEN– https://www.youtube.com/watch?v=iuUQl6ZOSpg
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा