Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Coronavirus
कोरोना काळात विधवा झालेल्या महिलांना सरकारकडून वर्षाला 50 हजार मिळणार असल्याचा दावा करण्या-या अनेक पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. या जिजाऊ/ जिजमाता योजना अशाच महिलांसाठी आहे अशीही माहिती या पोस्टमध्ये दिलेली आहे.
व्हायरल पोस्टमध्ये काय म्हटले आहे?
“जिजाऊ/ जिजमाता ही योजना अशा महिलांसाठी आहे ज्या महिला कोरोना काळात विधवा झाल्या आहेत ( 1 मार्च 2020 ते 28 फेब्रुवारी 2021) ह्या काळात घरातील कर्त्या व्यक्तीचे निधन झाले आहे त्याच्या साठी ही योजना आहे (वय वर्षे 21 ते 70 ही मर्यादा आहे. प्रति लाभार्थी 50,000 रुपये वर्षाला मिळतील..” अधिक माहितीसाठी 7016169045 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन देखील पोस्टमध्ये करण्यात आले आहे.
फेसबुकवर हा दावा मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेक यूजर्सनी हा दावा मागील महिन्यापासून शेअर केला आहे.
कोरोना काळात विधवा झालेल्या महिलांना सरकारडून खरंच वर्षाला 50 हजार रुपये मिळणार आहेत का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. सुरुवातीला पोस्टमध्ये दिलेल्या मोबाईल नंबर वर संपर्क साधला असता हा नंबर बंद असल्याचे आढळून आले.
यानंतर आम्ही जिजाऊ जिजामाता योजना कोरोना काळात सुरु झाली आहे का व तिचे स्वरुप नेमके काय आहे याचा शोध सुरु केला असता आम्हाला महिला व बालविकास विभागाच्या वेबसाईटवर या योजनेविषयी माहिती मिळाली मात्र. ही माहिती व्हायरल पोस्टमधील दाव्याशी मिळती जुळती नाही.
वेबसाईटवर या योजनेची माहिती देण्यात आली आहे की,महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे जिथे कुपोषणाशी लढण्याचे कार्य मिशनसारखे राबवण्यात येत आहे आणि याच उद्देशाने राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य आणि पोषण मिशनची स्थापना करण्यात आली आहे. आरोग्य आणि पोषण मिशनचा पहिला टप्पा 2005 मध्ये आणि दुसरा टप्पा नोव्हेंबर 2011 मध्ये आखण्यात आला होता. या मिशनचे मुख्य उद्दिष्ट महाराष्ट्रातील कुपोषण समस्या कमी करणे असून त्यासाठी गर्भधारणेपासून पहिल्या 1000 दिवस म्हणजेच वजा 9 ते 24 महिन्यांच्या कालावधीवर लक्ष केंद्रित केले जाते.
राजमाता जिजाऊ मिशन ही एक तांत्रिक आणि सल्लागार स्वायत्त संस्था असून संपूर्णत: युनिसेफच्या अर्थसाहाय्यावर चालते. याचा मुख्य हेतू महाराष्ट्र शासन, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि आय सी डी एस आयुक्तालय यांच्या मध्ये संवाद आणि सहयोग घडवून आणणे हा आहे.महिला आणि बालक विकास विभाग आणि या मिशनच्या कार्यात कोणताही संभ्रम आणि पुनरावृत्ती होऊ नये याकरिता मिशनची भूमिका स्पष्टपणे अधोरेखित करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्याने अगदी विचारपूर्वक निर्णय घेतला की या मिशनला शासकीय अर्थसाहाय्य देण्यात येणार नाही आणि या मिशनतर्फे कोणत्याही योजनांची थेट अमंलबजावणी करण्यात येणार नाही. यामुळे मिशनला स्वतंत्रपणे आणि स्वायत्तपणे कार्य करणे शक्य होते. या मिशनची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत:
यावरुन हे स्पष्ट झाले की महिला व बालविकास विभागाच्या जिजाऊ जिजामाता योजनेच्या नावाशी साधर्म्य असणारी फसवी योजना काही समाजकंटकांनी सुरु केल्याचे स्पष्ट झाले. जिजाऊ/जिजामाता ही योजना सरकारने सुरु केली नसल्याचे पत्र महिला व बालविकास आयुक्तालयामार्फत जिल्हा महिला व बालविकास अधिका-यांना पाठवण्यात आले होते. यात म्हटले आहे की, “सदर पोस्ट खोटी व बनावट असून अशा प्रकारची कोणतीही योजना आपल्या विभागामार्फत कार्यान्वित नाही. तथापि या मेसेजमुळे नागरिकांची फसवणुक होण्याची शक्यता लक्षात घेता अशी कोरणतीही योजना महिला व बालविकास विभागाकडून राबविली जात नसून या मेसेजला नागरिकांनी बळी पडू नये असे आवाहन आपण आपल्या जिल्ह्याच्या माहिती अधिकारी यांच्या मार्फत स्थानिक प्रसारमाध्यमांत करावे.”
आमच्या पडताळणीत स्पष्ट झाले की, कोरोना काळात विधवा झालेल्या महिलांना दरवर्षी 50 हजार रुपये मिळणार असल्याचा दावा खोटा आहे. सरकारने अशी कोणतीही योजना सुरु केलेली नाही.
Read More : देशी दारुच्या काढ्याने कोरोना रुग्ण बरे होत असल्याचा डाॅक्टरचा दावा, जाणून घ्या सत्य
Claim Review: कोरोना काळात विधवा झालेल्या महिलांना सरकारकडून वर्षाला 50 हजार मिळणार Claimed By: Social Media post Fact Check: false |
WHO- https://www.who.int/news-room/q-a-detail/radiation-5g-mobile-networks-and-health
CNEThttps://www.cnet.com/news/is-5g-making-you-sick-probably-not/
Medicalnewstoday- https://www.medicalnewstoday.com/articles/326141
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.
Yash Kshirsagar
May 4, 2021
Yash Kshirsagar
May 5, 2021
Yash Kshirsagar
May 12, 2021