Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Coronavirus
कोरोनामुळे मृत पावलेल्या रुग्णांच्या बँक अकाऊंटमधून 330 किंवा 12 रुपये कपात झाले असतील तर त्याच्या नातेवाईकांना 2 लाखांची विम्याची रक्कम मिळू शकेल असा मेसेज सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहेत.
मेसेजमध्ये काय म्हटले आहे?
जर कोणाचे नातेवाईक 1एप्रिल ते 31 डिसेंबर 2020 ह्या दरम्यान करोना मुळे मृत झाले असतील, तर त्यांच्या नातेवाइकासाठी एक महत्वाची माहिती..जर मृत्यू पावलेल्या इसमाचे कोणत्याही बँकेत अकाउंट असेल तर त्यांचे पासबुक घेऊन बँकेत जा आणि 1 एप्रिल ते 31 डिसेंबर 2020 पर्यंत चे स्टेटमेंट मांगा आणि त्या स्टेटमेंट मध्ये रु 330/- ( ppjsvy) प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजना असे जर पैसे गेलेले असतील तर बँक मॅनेजर ला जाऊन भेटा आणि ह्या विम्या बद्दल बोला. कारण जर हे पैसे तुमचे गेलेले असतील तर त्या नातेवाईकाना पूर्ण रु. 2,00,000/- (दोन लाख रुपये) मिळणार
जर कोणाचे नातेवाईक 1एप्रिल ते 31 डिसेंबर 2020 ह्या दरम्यान करोना मुळे मृत झाले असतील तर त्यांना 2 लाख रुपये विम्याची रक्कम मिळू शकते का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. यासाठी आम्ही प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) या दोन योजनाविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ १८ ते ५० वयोगटातील बँक अकाऊंटधारक नागरिकांना मिळतो.यासाठी आधार कार्ड KYC गरजेचे आहे. आपण जर बँकमध्ये जाऊन या विम्याचा फॉर्म भरला असेल तर दरवर्षी 330 रुपये प्रीमियम कपात होतो. हे 1 जून ते 31 मे या वार्षिक कालावधीसाठी ग्राह्य धरले जाते. या वर्षभराच्या कालावधीत विमा असणाऱ्या व्यक्तीचा ‘कुठल्याही कारणाने’ मृत्यू झाला तर त्याने फाॅर्ममध्ये नमूद केलेल्या वारसास 2 लाख रुपये रक्कम मिळते.18 ते 50 वय असणाऱ्यांनानव्याने या विम्यासाठी नाव नोंदवता येत असले तरी 55 वर्षे वयापर्यंतच्या लोकांना या वार्षिक विमा रक्कम भरुन नूतनीकरण करता येते. यावरुन हे स्पष्ट होते की, मृतकाचे वय ५५ च्या आत असेल आणि 330 रुपयांचा वार्षिक प्रीमियम बॅंक खात्यातून कपात झाला असेल तर त्याच्या वारसाला २ लाख रुपये विम्याची रक्कम मिळू शकते.
भारत सरकारच्या जनसुरक्षा वेबसाईटवर याची माहिती देण्यात आली आहे.
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना देखील बॅंकेत बतच खाते असणा-या 18 ते 70 वयाच्या नागरिकांसाठी आहे. जर या बॅंक खाते धारकाने या योजनेचा फॉर्म भरला असेल तर 1 जून ते 31 मे या वर्षभराच्या कालावधीत प्रीमियम म्हणून केवळ १२ रुपये आपोआप बचत खात्यातून कपात होतात.या विम्याची रक्कम भरणाऱ्या व्यक्तीचा त्या वर्षी अपघाती मृत्य झाला किंवा कायमस्वरूपी पूर्णतः अपंगत्व आलं तर वारसदारास रुपये 2 लाख मिळतात. त्याच वर्षी जर विमाधारकास कायमस्वरूपीचे काही प्रमाणात अपंगत्व आले तर 1 लाख रपये इतकी विम्याची रक्क मिळू शकते. याची माहिती देखील जनसुरक्षा वेबसाईवर देण्यात आली आहे.
आमच्या पडताळणीत स्पष्ट झाले की, प्रधानमंत्री सुरक्षा योजनेतून कोरोना मृतांच्या नातेवाईंकांना 2 लाख रुपयाचां लाभ मिळत असल्याचा दावा चुकीचा आहे.
Read More : टाटा हेल्थ कंपनीने घरगुती कोविड-19 मेडिकल किट सुचविले आहे का?
Claim Review: कोरोनाने मृत्यू पावल्यास बँक खात्यावरील विम्याचे 2 लाख नातेवाईकांना मिळणार Claimed By: Social Media post Fact Check: False |
Jansuraksha.gov.in- https://jansuraksha.gov.in/Files/PMJJBY/English/About-PMJJBY.pdf
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.
Yash Kshirsagar
May 5, 2021
Yash Kshirsagar
May 12, 2021
Yash Kshirsagar
May 17, 2021