Thursday, April 25, 2024
Thursday, April 25, 2024

HomeCoronavirusCOVID-19 Vaccineमासिक पाळीदरम्यान महिलांनी कोरोना लस घेऊ नये? हे आहे व्हायरल मेसेजचे सत्य

मासिक पाळीदरम्यान महिलांनी कोरोना लस घेऊ नये? हे आहे व्हायरल मेसेजचे सत्य

Authors

मासिक पाळीदरम्यान महिलांनी कोरोना लस घेऊ नये असा एक मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोरोनाची दुसरी लाट आली असून देशभरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.भारत सरकारने लसीकरण मोहिमेचा वेग अधिक वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 1 मे 2021 पासून देशभरातील 18 वर्षांवरील सर्व नागरिक हे लसीकरणासाठी दिली जाणार आहे. मात्र याच दरम्यान हा मेसेज सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

मेसेजमध्ये काय म्हटले आहे?

एक मे पासून 18 वर्षावरील व्यक्तींना लसीकरणाची मोहिम सुरु होणार आहे. परंतु महिलांसाठी हे महत्वाचे आहे की मासिक पाळीची तारीख आणि लसीकरण कधी घ्यावे हे समजूनच लसीकरणा चा निर्णय घ्यावा… मासिक पाळीच्या पाच दिवस अगोदर किंवा पाच दिवस नंतर करु नये कारण त्यावेळेस आपल्या शरीराची रोगप्रतिकारक्षमता ही फार कमी झालेली असते… लसीकरण हे सुरवातीला आपली रोगप्रतिकारक्षमता कमी करते व नंतर खूप झपाट्याने वाढवते, जेव्हा आपली रोगप्रतिकारक्षमता असते तेव्हा कोरोना लागण होण्याची शक्यता वाढू शकतो.म्हणून ही खबरदारी घ्यावी.

संग्रहित

फेसबुक आणि शेअरचॅट या सोशल मीडिया प्लॅटफार्मवर हा मेसेज मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

crowdtangle वर या पोस्ट संदर्भात 3,065 इस्ट्रेक्शन्स आढळून आहेत मासिक पाळी आली असताना कोरोना लस घेऊ शकता का? ही बीबीसी मराठीची फेसबुक पोस्ट सर्वात जास्त पाहिली गेली आहे. या पोस्टला 41600 व्यूज मिळाले आहेत.

Fact Check/Verification

मासिक पाळीच्या पाच दिवस अगोदर किंवा पाच दिवस नंतर करु नये कारण त्यावेळेस आपल्या शरीराची रोगप्रतिकारक्षमता ही फार कमी झालेली असते. हा मेसेज कितपत खरा आहे याची पडताळणी आम्ही सुरु केली पण आम्हाला मुख्य प्रवाहातील माध्यमांत ही बातमी आढळून आली. नाही काही किवर्डसच्या आधारे शोध घेत असताना आम्हाला पीआयबीचे महाराष्ट्रचे एक ट्विट आढळून आले.

यात म्हटले आहे की, महिलांनी मासिक पाळीच्या 5 दिवस अगोदर आणि 5 दिवस नंतर #COVID19Vaccine लस घेऊ नये असा दावा करणारा #Fake संदेश समाजमाध्यमांवर आहे. अफवांना बळी पडू नका! 18 वर्षावरील सर्वांनी 1 मे पासून लसीकरण करुन घेणे आवश्यक आहे. नोंदणी तारखेपासून http://cowin.gov.in पोर्टलवर सुरु होत आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सुद्धा ट्विट करुन सांगण्यात आले आहे की, महिलांनी मासिक पाळीच्या कालावधीत लस घेऊ नये अशा आशयाचा संदेश समाज माध्यमांवर प्रसारित होत आहे. या ट्विटमध्ये म्हटले आहे की,अफवांपासून लांब राहा! महिलांनी मासिक पाळीच्या कालावधीत लस घेऊ नये अशा आशयाचा संदेश समाज माध्यमांवर प्रसारित होत आहे यातील माहिती खोटी असून, मासिक पाळी सुरू असताना लस घेतल्यास आपल्या शरीरावर कुठलाही परिणाम होत नाही कृपया अफवांवर विश्वास ठेवू नका व त्या पसरवू नका

याशिवाय राज्य सर्वेक्षण अधिकारी डाॅ. प्रदीप आवटे यांनी माध्यमांशी या संदर्भात बोलताना सांगितले की, आपल्याकडे मासिक पाळीसंदर्भात ज्या अंधश्रध्दा आहे, त्यातूनच या पोस्ट व्हायरल होत आहेत की मासिक पाळीत लस घेऊ नये. मात्र लस घेणं, मासिक पाळी, प्रतिकार शक्ती यांच्या परस्पर संबंधांना कुठलाही शास्त्रीय आधार नाही. महिलांनी लस घ्यावी, मासिक पाळीच्या काळातही घ्यायला काहीच हरकत नाही.

Conclusion

आमच्या पडताळणीत स्पष्ट झाले की, महिलांनी मासिक पाळीदरम्यान कोरोनाची लस घेऊ नये ही अफवा आहे. मासिक पाळी दरम्यान महिलांनी लस घेण्यात कोणताही धोका नाही, हे सरकारने स्पष्ट केले आहे.

Read More : टाटा हेल्थ कंपनीने घरगुती कोविड-19 मेडिकल किट सुचविले आहे का?

Result: False

Claim Review:  मासिक पाळीदरम्यान महिलांनी कोरोना लस घेऊ नये
Claimed By: Social Media post
Fact Check: False

Our Sources

पीआयबी महाराष्ट्र- https://twitter.com/PIBMumbai/status/1385961575979180040

मुंबई महानगरपालिका ट्विट- https://twitter.com/mybmc/status/1385978676068569090


कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular