Crime
Weekly Wrap: शालेय पुस्तकांवर कर ते हिंदू महिलेची तिच्या मुस्लिम जोडीदाराकडून हत्या पर्यंतच्या दाव्यांचे फॅक्ट चेक
डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडाही अनेक फेक दाव्यांनी गाजला. शालेय पुस्तकांवर कर बसविणारा पहिला देश भारत ठरला आहे, असा दावा करण्यात आला. कर्नाटकातील मुख्यमंत्रीपदाच्या रस्सीखेच दरम्यान, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी अलीकडेच काँग्रेस नेते डीके शिवकुमार यांची भेट घेतली, असा दावा करण्यात आला. दिल्लीमध्ये लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका हिंदू महिलेची तिच्या मुस्लिम जोडीदाराने हत्या केली, असा दावा करण्यात आला. भारतीय लष्कराचे सैनिक पाकिस्तानी सैन्याशी लढण्यास घाबरत आहेत आणि घरी परतण्याची भीक मागत आहेत, असा दावा करण्यात आला. बीएसएफच्या जम्मू आणि काश्मीरच्या आयजींनी दहशतवादविरोधी कारवाईत आम्हाला काहीही यश मिळालेले नाही असा खुलासा केल्याचा दावा करण्यात आला. या आणि इतर दाव्यांचे फॅक्ट चेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.

शालेय पुस्तकांवर कर लावणारा जगातील पहिला देश भारत?
शालेय पुस्तकांवर कर बसविणारा पहिला देश भारत ठरला आहे, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आढळला.

डीके शिवकुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या भेटीचा व्हिडिओ जुना
कर्नाटकातील मुख्यमंत्रीपदाच्या रस्सीखेच दरम्यान, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी अलीकडेच काँग्रेस नेते डीके शिवकुमार यांची भेट घेतली, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले.

हिंदू महिलेची तिच्या मुस्लिम जोडीदाराने हत्या केली?
दिल्लीमध्ये लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका हिंदू महिलेची तिच्या मुस्लिम जोडीदाराने हत्या केली, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे उघड झाले.

भारतीय सैनिक पाकिस्तानी सैन्याला ‘धोकादायक’ म्हणत आहेत?
भारतीय लष्कराचे सैनिक पाकिस्तानी सैन्याशी लढण्यास घाबरत आहेत आणि घरी परतण्याची भीक मागत आहेत, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे उघड झाले.

जम्मू आणि काश्मीरच्या आयजींनी दहशतवादविरोधी कारवाईत काहीही साध्य झाले नाही असे म्हटले?
बीएसएफच्या जम्मू आणि काश्मीरच्या आयजींनी दहशतवादविरोधी कारवाईत आम्हाला काहीही यश मिळालेले नाही असा खुलासा केल्याचा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे निदर्शनास आले.